नव्या नावासह आयपीएलच्या मैदानात उतरणार किंग्ज इलेव्हन पंजाब ?

नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएल लिलावात पंजाबने नव्या खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावली. दरम्यान, किंग्ज इलेव्हन पंजाब यंदा नव्या शिलेदारांसह आयपीएलच्या रणांगणात उतरणार आहे.  एवढेच नाही तर आता पंजाबने नव्या नावासाठीही बीसीसीआयकडे मागणी केली आहे.
पंजाबने दिग्गज खेळाडूंची फौज जमवली. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये पंजाबला आयपीएल चॅम्पियन होता आले नाही. पण आता नव्या खेळाडूंसह संघाची बांधणी केल्यानंतर नाव बदलण्याची परवानगी पंजाब संघाच्या फ्रँचायझींनी मागितली आहे.
आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी नाव बदलण्याची पंजाबने मागणी केल्याच्या वृत्ताला बीसीसीआयमधील अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. बीसीसीआयने ही परवानगी दिल्यास पंजाबचा संघ नाव बदलून मैदानात उतरणारा आयपीएलच्या इतिहासातील पहिलाच संघ असणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)