नव्या ट्रेंडच्या राख्यांची सर्वांनाच भुरळ

पुणे – भावा-बहिणीच्या अतूट बंधनाचा दिवस म्हणजे रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर येउन ठेपला आहे. यासाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. स्थानिक बाजारपेठांबरोबरच तरुणाईची पसंती असलेली ऑनलाईन बाजारपेठही रक्षाबंधनासाठी नव्या ट्रेंडच्या राख्या घेउन तयार आहे. तरुणाईसाठी सद्या स्टाईल, फॅशन महत्वाची असल्याने त्याप्रमानेच सद्या राख्या ही बाजारात उपलब्ध आहेत.

यंदा सगळ्यात जास्त ‘कूल ट्रेंड’ आहे तो म्हणजे ‘वीर’, ‘भाई’, ‘ब्रो’ लिहिलेल्या आणि धाग्यात गुंफलेल्या राखीचा. अॅक्रेलिक आणि लाकूड या दोन प्रकारांत या राख्या उपलब्ध आहेत. अॅक्रेलिकला सोनेरी रंग असणारी आणि राखीवर कोरलेल्या शब्दाने त्याचं व्यक्तिमत्त्व सांगणारी ‘सोन्याची राखी’ बाजारात मोठया प्रमाणात दिसत आहे. या राख्यांची किंमत साधारण 120 ते 200 च्या घरात असून त्यांचा खपही मोठया प्रमाणावर होतो आहे. ऑनलाईन मार्केट म्हणजे अॅमेझोन, फ्लिपकार्ट किंवा तत्सम साइट्‌सवरही या राख्या उपलब्ध आहेत.

कस्टमाईज्ड गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी भावांना त्यांच्या नावाची राखी बांधणं बहिणी पसंत करताहेत. नावं वेगवेगळ्या फॉण्ट आणि स्टाइलमध्ये कोरून अॅक्रेलिक, लाकूड किंवा मग धातूवर तयार केलेली ही राखी सगळ्यांनाच भावते आहे. बाजारात अशा राख्यांचं प्रमाण तितकंसं नसलं तरी ऑनलाईन अशा राख्या खास बनवून घेण्याला पसंती मिळते आहे. साधारण 200 ते 250 रुपये किंवा राखीच्या गुणवत्तेच्या आधारावर थोडयाफार कमी-जास्त पैशात अशा राख्या ऑनलाईन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

बच्चेकंपनीला कार्टून्स कॅरेक्‍टर्सबद्दल कायम उत्सुकता असते. बच्चेकंपनीची हीच आवड हेरत यंदा मोटू-पतलू, छोटा भीम, बालगणेश, डोरेमॉन, शिनचॅन या कार्टून्स कॅरेक्‍टर्सच्या आणि स्पिनरच्या राख्यांनी आणि बॅंड्‌सनी बाजारपेठा सजल्या आहेत. काही दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनानिमित्त या राख्यांचा नवा ट्रेंड हिट झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)