नव्या-जुन्या नायिकांची ‘धडपड’

बॉलीवूडमधील नव्या-जुन्या नायिका सध्या आपला ठसा पुन:श्‍च उमटवण्याच्या प्रयत्नात आहेत. ऐश्‍वर्या राय, माधुरी दीक्षित नेने यांना त्यांच्या आवडीच्या चित्रपटात काम करायला मिळते आहे तर दुसरीकडे कंगना रनौत, दीपिका, अनुष्का या मधल्या पिढीतील नायिकांना घेऊन मोठे मोठे चित्रपट तयार होत आहेत. व्यतिरिक्‍त जान्हवी, सारा अली खान, अन्यन्या पांडे या नवख्या कलाकारांविषयीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसते आहे.

शर्मिला टागोर आणि पतौडी यांचा मुलगा सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान हिचे परिश्रम आता फळाला आले आहेत. तिचा “केदारनाथ’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. त्याचबरोबर “सिंबा’ या तिच्या मोठ्या चित्रपटाचे चित्रीकरण वेगाने सुरू आहे. या वर्षांच्या शेवटी साराचा दुसरा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. साराचे करिअरकडे तिची आई अमृता सिंग लक्ष ठेवून आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीदेवीच्या मुलीने “धडक’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या मनात घर केले. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच तिचे अनेक चाहते तयार झाले. आता तिला कारकिर्दीकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे. जान्हवीने मात्र दुसरा कोणताही चित्रपट अजून स्वीकारलेला नाही.

जुन्या जमान्यातला अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अन्यन्या पांडेचे भवितव्य करण जोहरच्या “स्टुडंट ऑफ दी इअर 2′ च्या यशावर अवलंबून आहे. यातून अन्यन्याला मोठी संधी मिळाली आहे. तिच्या पाठोपाठ कृति सेननसारख्या अनेक नायिका रांगेत आहेत. या सर्वांना आलिया भट्ट हीच मोठी आव्हान देणारी आहे. त्यामुळेच स्टारडम त्यांच्यासाठी सोपे नाही.

एकीकडे नव्या दमाच्या या अभिनेत्री स्टारडमसाठी झगडत असतानाच “प्रस्थापित’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नायिकाही नव्याने झेप घेण्यासाठी धडपडत आहेत. माधुरी दीक्षित हे यापैकी एक महत्त्वाचे नाव. 51 व्या वर्षीही ती “डबल धमाका’, “कलंक’ या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. 44 वर्षीय ऐश्‍वर्या रायकडे करण जोहरसह इतरही अनेक निर्मात्यांच्या ऑफर्स तिच्याकडे आहेत.

थोडक्‍यात काय तर भविष्यातही काम करत राहाणार आहे. तिशी पार केलेल्या अभिनेत्रींमध्ये एक आहे कंगना रनौत. तिचा वेग जास्त आहे. ती सध्या नंबर एकची अभिनेत्री म्हणून गणली जाण्याची शक्‍यता जास्त आहे. कंगनाचा एक महत्त्वाचा चित्रपट येऊ घातला आहे. “मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी.’ त्याचबरोबर “मेंटल हे क्‍या’ सारखे बिग बजेट चित्रपट तिच्याकडे आहेत. सध्याचा ट्रेंड पाहता यावर्षी सर्वदूर कंगनाचा बोलबाला असेल. म्हणजे सर्वात पुढे कंगना आणि तिच्या मागे नवोदित आणि जुन्या काळातील अभिनेत्री असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)