नव्या इमारतीच्या स्ट्रक्‍चरल ऑडीटलाही घाईच

पालिकेला सात दिवसांत हवे ऑडीट
पुणे  : महापालिकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या घाईमुळे घाई गडबडीने काम उरकणाऱ्या पालिका प्रशासन आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनाही इमारतीच्या स्ट्रक्‍चरल ऑडीटचीही घाई झाल्याचे समोर आले आहे. या नवीन विस्तारीत इमारतीचे कॉम्प्रेहेन्सीव स्ट्रक्‍चर ऑडीट सात दिवसात करून द्यावे असे पत्र महापालिका प्रशासनाने गुरूवारी तातडीने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला दिले आहे. त्यामुळे सात दिवसात हे ऑडीट योग्य पध्दतीने होणार की संबधिताना क्‍लीन चीट देण्यासाठी ही गडबड केली जात आहे असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेअ. दरम्यान, या पत्रात, उद्घाटनाच्या दिवशी इमारतीमध्ये एका नव्हे तर दोन ठिकाणी पाणी गळती झाल्याचे नमूद केले असल्याने दुसरी गळती नेमकी कोठी झाली याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महापालिकेकडून तब्बल 49 कोटी रूपये खर्चून नवीन विस्तारीत इमारत बांधली आहे. या इमारतीचे उद्घाटन मागील आठवडयात देशाचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या इमाररीचा लोकार्पन सोहळा सुरू असतानाच; या इमारतीच्या छतामधून पावसाचे पाणी गळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, तर बुधवारी सायंकाळी या इमारतीच्या गॅलरीचे काम सुरू असतानाच; मोठा स्लॅबचा तुकडा पडून एक महिलाही जखमी झाली आहे. त्यामुळे या इमारतीच्या कामाचा दर्जा आणि उद्घाटनासाठी काम पूर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचे पडसाद गुरूवारी झालेल्या मुख्यसभेत उमटले यावेळी विरोधीपक्षांकडून आंदोलन करून सत्ताधारी आणि प्रशासनावर जोरदार टिक करण्यात आली. हे आंदोलन सुरू असतानाच; प्रशासनाकडून या इमारतीचे ऑडीट करण्याचे पत्र, सीओईपीला हातोहात पाठविण्यात आले. त्यात या इमारतीची गळती झालेली असल्याने सात दिवसांच्या आत ऑडीट करून द्यावे त्यासाठी आवश्‍यक असलेली माहीती, नकाशे पालिकेकडून तत्काळ उपलब्ध करून दिले जातील असे नमूद करण्यात आले आहे.

एक नव्हे दोन ठिकाणी गळती
उद्घाटनाच्या दिवशी या इमारतीमध्ये सभागृहाच्या पूर्व दिशेला एका ठिकाणी गळती झाल्याचे समोर आले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने दिलेल्या पत्रानुसार, प्रत्यक्षात दोन ठिकाणी गळती झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दुसरी गळती कोठे झाली आणि त्यामुळे काही नुकसान झाले का या बाबत प्रश्‍न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. तसेच पालिकेला सात दिवसांच्या आत ऑडीट रिपोर्ट हवा असल्याने या कामाच्या तपासणीसाठी घाई केली जाणार नाही ना असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)