नव्याने निर्मित सहा डोंगरी तालुक्यांना मिळणार साडेचार कोटींचा निधी – दीपक केसरकर

मुंबई – डोंगरी भागातील विकास कामांसाठी राबविण्यात येत असलेल्या डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात सहा नवीन डोंगरी तालुक्यांची निर्मिती झाली असून या तालुक्यांना सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात येणार अाहे. याबाबतचा लवकरच  शासन आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी 2018-19 या वर्षाच्या नियोजन विभागाच्या अर्थसंकल्पिय मागण्यांच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेस उत्तर देताना विधानसभेत दिली.

राज्यातील सर्व विभागांचा समतोल विकास व्हावा, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असते. डोंगरी विभागांच्या गरजा इतर प्रदेशांपेक्षा वेगळा असतात. त्यामुळे डोंगरी भागातील विशिष्ट गरजा लक्षात ठेवून ती कामे पूर्ण करण्यासाठी डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत डोंगरी तालुक्यांची निर्मिती करून त्यांना विशेष निधी उपलब्ध करून दिला जातो. राज्यातील 22 जिल्ह्यातील 73 पूर्णगट डोंगरी तालुके व 35 उपगट डोंगरी तालुक्यांचे विभाजन करून या नव्या सहा पूर्णगट व उपगट तालुक्यांची निर्मिती करण्यात आली आहे.अशी माहिती यावेळी दीपक केसरकर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)