नव्याने इतिहास लिहिला जाईल तेव्हा बसव चळवळ अग्रस्थानी – डॉ. येळणे

नांदेड – महाराष्ट्र ही नेहमीच इतिहासाच्या चळवळीचे केंद्र म्हणून अग्रेसर राहिले आहे, जेव्हा कधी महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास नव्याने लिहिला जाईल तेव्हा बसव चळवळ ही अग्रस्थानी असेल असे मत डॉ. घनश्‍याम येळणे यांनी बसव ब्रिगेडच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षीय भाषणातून बोलत असताना व्यक्त केले.

विष्णुपुरी येथील सहयोग कॅम्पस येथे बसव ब्रिगेड या संघटनेच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. घनश्‍याम येळगे हे होते. यावेळी अतिथी म्हणून भाजपा महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बसव ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष ऍड. अविनाश भोसीकर, डॉ. नितीन शेट्टे, बसव ब्रिगेड राज्य उपाध्यक्ष नागनाथ स्वामी, डॉ. नागनाथ पाटील, प्रा. आनंद कर्णे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. गायत्री लकडे, प्रा. रविकांत काळे, शाहू वासमकर यांच्यासह आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ऍड. अविनाश भोसीकर यांनी संघटनेची ध्येय, धोरणे आणि वाटचाल याविषयी माहिती देत असताना म्हणाले, राज्यातील एकमेव बसव ब्रिगेड ही संघटना असून या संघटनेपासून लिंगायत हा शब्द समोर करून देशातील सर्व लिंगायतांना एकत्र करण्याचे काम केले आहे. इतर संघटन मात्र सोयीनुसार नावे बदलत आहेत. लिंगायत धर्म मान्यतेसाठी देशव्यापी लढा उभा केला जात असून वेळप्रसंगी देशाच्या राजधानीत देखील लिंगायताची चळवळ उभी केली जाणार असल्याची मत त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विविध आघाडी व संघटनेचे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये बसव ब्रिगेड विद्यार्थी जिल्हाध्यक्षपदी ओमराज भाले यांची निवड करण्यात आली. याचबरोबर शहराध्यक्ष प्रदीप जनकवाडे, शहर उपप्रमुख म्हणून संतोष कडेकर, नांदेड तालुकाध्यक्ष गंगाधर कडेकर, नांदेड सहसचिव मल्हारी सोमनगिरे, विद्यार्थी आघाडी जिल्हासचिव सचिन बोंबळे, शहराध्यक्ष नितीन चोंचीकर, हडको-सिडको विभागप्रमुख नागेश कापसीकर, उपविभाग प्रमुख शुभम स्वामी आदींची यावेळी प्रशस्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हणमंत कल्याणकर यांनी केले तर आभार अमित महाजन यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात युवकांची व महिलांची संख्या उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)