नवोदित कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकले

पुणे  – पुणे फेस्टिव्हलमध्ये उगवत्या व नवोदीत कलाकारांसाठी असणारा “इंद्रधनू भाग 2′ कार्यक्रम आज बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पार पडला. नवोदित कलाकारांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनास प्रेक्षकांनी “वन्समोअरफचा पुकारा करीत मोठा प्रतिसाद दिला. युवा कलाकारांच्या मोठ्या प्रतिसादामुळे “इंद्रधनूफ हा कार्यक्रम दोन भागात घेतला गेला. कालच्या प्रमाणे आजही मइंद्रधनूफ भाग 2 मध्ये शंभरहून अधिक कलाकारांनी त्यात सहभाग घेतला.

आजच्या “इंद्रधनू’मध्ये शास्त्रीय संगीत व नृत्य, समूह नृत्य, चित्रपट संगीत, पीयानो – तबला – सिंथेसायझर – हार्मोनियम – गिटार वाद्यवादन, भारतीय व पाश्‍चमात्य संगीतावर आधारीत नृत्य, नाट्यछटा, पोवाडा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची दिलखेचक झलक या युवा कलाकारांनी दाखवली. त्यातील अनेकांना रसिक प्रेक्षकांचा वन्स मोअर मिळाला.
“इंद्रधनू’चे संयोजक रविंद्र दुर्वे यांनी याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलतर्फे सर्व कलाकारांचे आभार मानुन म्हटले की, गेले 29 वर्षे मपुणे फेस्टिव्हलफमध्ये मइंद्रधनूफ कार्यक्रमात सहभाग घेऊन नावारुपास आलेल्या कलाकारांचे कार्यक्रम बघुन मनाला समाधान होते आणि “इंद्रधनू’आयोजनाचा हेतू फलद्रूप झाला असे म्हणावे लागेल.

या प्रसंगी सहभागी कलावंताच्या पालकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी “”पुणे फेस्टिव्हल'” मध्ये तरुण कलाकारांना हक्‍काचे व्यासपिठ मिळाते, त्यांना कार्यक्रम करण्याची संधी मिळाते आणि त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढतो. त्याबद्दल पुणेकरांतर्फे पुणे फेस्टिव्हलला आम्ही धन्यवाद देतो अशा भावना अनेक पालकांनी यावेळी व्यक्‍त केल्या. पुणे फेस्टिव्हल तर्फे श्रीकांत कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)