नवोदय परीक्षेत किवळे येथील गायत्री देशमुख हिचे यश

टाकवे बुद्रुक : गायत्री देशमुख हिचा सन्मान करताना उपसरपंच तुकाराम जाधव यांच्यासह ग्रामस्थ.

टाकवे बुद्रुक – आंदर मावळमधील अतिदुर्गम भागात असणाऱ्या किवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी गायत्री सुनील देशमुख हिने पाचवीमध्ये शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या नवोदय परीक्षेत 96 गुण मिळवून मेरीटमध्ये आली. तिला नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. गायत्रीने मिळवलेल्या यशाबद्दल तिच्या पालकांनी आनंद व्यक्‍त केला आहे. गायत्रीच्या अभ्यासाबरोबरच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रोडगे, उंबरदंड मॅडम यांनीही खूप परिश्रम घेतले. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने गायत्रीचा सन्मान करण्यात आला.

या वेळी उपसरपंच तुकाराम जाधव, माजी सरपंच शरद जाधव, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिनेश पिंगळे, तंटामुक्‍त गाव समितीचे अध्यक्ष नवनाथ जाधव, अरुण पिंगळे, पोलीस पाटील राजाराम पिंगळे, विजय पिंगळे, सुनील देशमुख, अनंता वायकर, उंबरदंड मॅडम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)