नवे कुलसचिव कोण?

पात्र उमेदवारांची नावे जाहीर : विद्यापीठामध्ये तर्कवितर्कांना उधान

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “कुलसचिव’ आणि “वित्त व लेखा अधिकारी’ या पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांच्या छाननीनंतर पात्र व अपात्र उमेदवारांची यादी विद्यापीठाने सोमवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार, उपकुलसचिव सुनील अत्रे, श्रीरंग बाठे, विद्यापीठ मुद्रणालय व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय कुटे यांचे नावही पात्र उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे विद्यापीठाचे नवे कुलसचिव कोण, यावरून विद्यापीठामध्ये तर्कवितर्क व चर्चा रंगत आहे.

विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी या दोन्ही पदांसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली. “कुलसचिव’ पदासाठी 28 उमेदवार पात्र, तर 12 उमेदवार अपात्र ठरले आहे. शर्मिला चौधरी यांचे अर्ज मुदतीनंतर प्राप्त झाल्याने, त्यांचे अर्ज विचारात घेतले गेले नाही. वित्त व लेखा अधिकारी पदासाठी 6 उमेदवार पात्र, तर 11 उमेदवारांचे अर्ज छाननीत अपात्र झाले आहेत. दरम्यान, तत्कालीन कुलसचिव नरेंद्र कडू यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्‍त होते. त्यानंतर या पदाचा अतिरिक्‍त कार्यभार विद्यापीठातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागप्रमुख डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्याकडे सोपविण्यात आला. गेल्या वर्षभरापासून कुलसचिव पदाचा कार्यभार “प्रभारी’वर सुरू आहे. या दोन्ही पदांसाठी 21 डिसेंबर 2017 रोजी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर आता चार महिन्यानंतर या दोन्ही पदांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कुलगुरूपदी विद्यापीठातील नितीन करमळकर यांची नियुक्‍ती झाली. त्याचप्रमाणे विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय कामांचा अनुभव असलेल्या व्यक्‍तींची या दोन्ही पदांवर निवड होणार असल्याची चर्चा विद्यापीठात होत आहे. अन्य विद्यापीठातील व्यक्‍तींना या दोन्ही पदांवर संधी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. मात्र, आतापर्यंतचा अनुभव पाहता विद्यापीठाच्या कोणत्याही पदांवर निवड होताना ऐनवेळी कोणत्या उमेदवारांची वर्णी लागेल, हे भाष्य वर्तविणे कठीण आहे.

कुलगुरूंना अधिकार…
नवीन विद्यापीठ कायद्यात कुलगुरूंना मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आले आहेत. या दोन्ही पदांच्या निवडीसाठी जी समिती नेमली जाणार आहे, त्याचे अध्यक्ष कुलगुरूंच राहणार आहे. या समितीत व्यवस्थापन परिषदेचे दोन सदस्य, कुलपती कार्यालयाकडून एक प्रतिनिधी, प्राचार्य व आरक्षण गटातून एक प्रतिनिधी अशी समितीची रचना आहे. या समितीकडून उमेदवारांच्या मुलाखती होतील. त्यानंतर उमेदवारांचे नाव निश्‍चित केले जाणार आहे.

विद्यापीठाच्या “कुलसचिव’ आणि “वित्त व लेखा अधिकारी’ या पदासाठी प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र व अपात्र उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी समिती नेमण्याची प्रक्रिया सुरू असून, एका महिनाभरात समिती नेमली जाणार आहे. त्यानंतर निवड प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होईल. – डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू

कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवार : भारत जिंतूरकर, सुनील अत्रे, अरविंद शाळिग्राम, दत्तात्रय कुटे, श्रीरंग बाठे, करीम शेख, अशोक देविकार, राजूसिंग चव्हाण, शंकर पवार, विजय पाटील, अनिता अरोरा, स्नेहल अग्निहोत्री, विजया खैरकार, बापू भोसले, सुहास पाटील, महेश देशपांडे, नितीन सोनजे, प्रमोद बोरसे, प्रफुल्ल पवार, विजय गायकवाड, गेनू दरेकर, केशव तुपे, देवानंद शिंदे, मिलिंद सूर्यवंशी, सुजाता आडमुठे, अभिजित जोशी, संजीवनी शेळके, प्रकाश करमाडकर.धिकारी पदासाठी पात्र उमेदवार : विद्या गारगोटे, विजय नलावडे, भारत कऱ्हाड, राजवर्धन इंडी, अतुल पाटणकर, मुकुंद भांबरे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)