नवी सांगवीत घरफोडी

पिंपरी – बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटामध्ये ठेवलेली सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरटयांनी लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रात्री सात ते शनिवारी (दि. 25) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली. नितीन रघुवीर कागडा (वय 31, रा. कवडेनगर, गल्ली नंबर दोन, नवी सांगवी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कागडा परिवारातील सर्व जण कामानिमित्त शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास बाहेरगावी गेले. रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले 68 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास कागडा परिवार बाहेरगावाहून परत घरी आले असता घराचे कुलूप तोडलेले दिसले. आतमध्ये पहिले असता लोखंडी कपाटात दागिने नसल्याचे दिसुन आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)