नवी मुंबई माथाडी कामगारांचा बेमुदत बंद

महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीचा निर्णय

कराड – पणन विभाग, कामगार विभाग व शासन निर्णयास स्थगिती द्यावी, माथाडी व सुरक्षा कामगार व व्यापारी वर्गांच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रश्‍नांची सरकारने सोडवणूक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी, हमाल व सुरक्षा रक्षक कामगार व व्यापारी वर्गाने 27 रोजी लाक्षणिक बंद पुकारला होता. तो आता बेमुदत बंद पुकारला असून हा संप फक्त नवी मुंबईतील बाजार समितीच्या आवारातील व इतर बाजार समित्यांमधील कामगारांचाच आहे. त्याव्यतिरिक्त इतर सर्व व्यवसायातील कामगारांची कामे सुरळीत राहणार असल्याचे महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने जाहीर करण्यात आले.

अन्य विभागांकडून वारंवार अन्याय करणारे निर्णय एकतर्फी काढण्यात आले. त्याला रोखण्यासाठी महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीची डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व नियमण) अधिनियम-1963 यात आणखी सुधारणा करण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढलेला अध्यादेश क्र. 24 ला स्थगिती देण्यासाठी माथाडी व व्यापारी वर्गाने बंद पुकारला होता. मात्र, विधिमंडळातील यासंदर्भातील अध्यादेशाला गोंधळात मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.

दरम्यान नवीमुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील दाणाबंदर मार्केट येथे सर्व व्यापारी व माथाडी वर्गाची भव्य सभा झाली. या सभेत ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस व माजी आ. नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष व माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, तसेच व्यापारी प्रतिनिधीक असोसिएशनचे पदाधिकारी मोहन गुरनानी, संजय पानसरे, किर्ती राणा, अशोक बढीया, अमृतलाल जैन, महेंद्र भाई, अशोक भेंडे, पिंगळेशेठ, शरद मारु आदी प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केले. या सभेमध्ये सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी बेमुदत संप जाहीर करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)