“नवी दिल्ली’ची ट्रेन गेली “जुनी दिल्ली’ला – अधिकारी निलंबित

नवी दिल्ली – नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला जाणारी ट्रेन चुकून जुनी दिल्ली रेल्वे स्टेशनला गेल्याची घटना मंगळवारी घडली आहे. या प्रकरणी एका लॉग ऑपरेटरला निलंबित करण्यात आल्याचे उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पानिपत-नवी दिल्ली आणि सोनपत-जुनी दिल्ली अशा दोन ट्रेन एकाच वेळी म्हणजे सकाळी 7.38 वाजता दिल्लीतील सदर बाजार रेल्वे स्टेशनवर आल्या होत्या.

एकाच वेळी आल्याने आणि जाण्याची वेळही एकच असल्याने गोंधळलेल्या लॉग ऑपरेटरने पानिपत-नवी दिल्ली ही ट्रेन चुकून जुनी दिल्ली रेल्वे स्टेशनला पाठवल्याची माहिती उत्तर रेल्वेच्या प्रवक्‍त्याने दिली आहे. या चुकीमुळे शेकडो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र चुकून जुनी दिल्ली रेल्वे स्टेशनला पाठवण्यात आलेली पानिपत-नवी दिल्ली ट्रेन चूक लक्षात येताच ताबडतोब नवी दिल्लीला पाठवण्यात आली. या प्रकरणी अस्लम नावाच्या लॉग ऑपरेटरला निलंबित करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)