नवीन शर्तीच्या, जमिनी भोगवटादार वर्ग-1 च्या करणे (भाग: 2)

प्रदिपरावांची नवीन व अविभाज्य शर्तीने प्रदान केलेली भोगवटदार वर्ग-2 ची इनामी जमीन होती. त्यांनी असे ऐकले होते की, सन 2002 मध्ये भोगवटादार वर्ग-2 च्या इनामी जमिनीच्या तरतुदीत काहीतरी सुधारणा झाली आहे. परंतु नेमकी काय सुधारणा झाली आहे, हे त्यांना नीट समजले नव्हते. नक्की काय सुधारणा झाली आहे हे कळून घेण्यासाठी प्रदिपराव तलाठी कार्यालयात आले. व त्यांनी याबाबतची माहिती तलाठी भाऊसाहेबांना विचारली. तलाठी भाऊसाहेबांनी सांगितले की, तुम्ही जे ऐकले ते अगदी योग्य आहे, प्रदिपराव.

जर कोणी ‘भोगवटादार वर्ग-2’ च्या जमीनी, 50 टक्के नजराणा रक्कम न भरता, अकृषीक वापर करण्यासाठी विकली असेल तर त्याला चालू बाजारभावाच्या किंमतीच्या 50 टक्के नजराणा रक्कम आणि नजराणा रकमेच्या 50 टक्के दंड भरुन अशी जमीन ‘भोगवटादार वर्ग-1’ मध्येल तबदील करून घेता येईल.

जर कोणत्याही शेतकऱ्याची ‘भोगवटादार वर्ग-2 आणि नवीन व अविभाज्य शर्तीने’ हा शेरा कमी करून त्याची जमीन ‘भोगवटादार वर्ग-1’ मध्ये (जुन्या शर्तीने) तबदील करुन विक्री करण्याची इच्छा असेल तर त्याने तहसिल कार्यालयात तसा लेखी अर्ज करावा. असा अर्ज मिळाल्यानंतर दोन दिवसात तहसील कार्यालय, अर्जदारास, त्या जमिनीच्या चालू बाजारभावाच्या किंमतीच्या 50 टक्के नजराणा रकमेचे लेखाशिर्ष नमूद असलेले चलन तयार करून देईल आणि संबंधीताने ही 50 टक्के नजराणा रक्‍कम, चलनाद्वारे शासकीय कोषागारात जमा केल्यानंतर ते चलन तसेच खरेदीची कागदपत्रे पाहून तलाठी त्या व्यवहाराची नोंद गाव नमुना नं. 6 मध्ये घेईल.

मंडलअधिकारी, ते रक्‍कम जमा केल्याचे चलन तपासून ‘भोगवटादार वर्ग-2 आणि नवीन व अविभाज्य शर्तीने’ हा शेरा कमी करण्या चा आदेश देतील आणि सदर जमीन ‘भोगवटादार वर्ग-1’ मध्ये तबदील होईल. उपरोक्त चलनाशिवाय इतर कोणत्याही आदेशाची आता आवश्‍यकता असणार नाही.

परंतु उपरोक्त शासन परिपत्रकाची तरतुद फक्त नवीन व अविभाज्य शर्तीने दिलेल्या भोगवटादार वर्ग-2 च्या इनामी आणि वतनी जमिनींनाच लागू असेल. महार वतनी जमिनी, कुळ कायदा कलम 43 च्या नवीन शर्तीवरील जमीनी, वाटप केलेल्या नवीन शर्तीवरील शासकीय जमीनी, कुळ कायदा कलम 84 क अन्वये वाटप केलेल्या नवीन शर्तीवरील जमीनी, सिलींग कायद्याखाली वाटप केलेल्या नवीन शर्तीवरील जमिनींना ही तरतुद लागू होणार नाही.

या सविस्तर माहितीमुळे प्रदिपरावांचे समाधान झाले.

(संदर्भ : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 149 व 150 ; महार वतनी जमिनींव्यतिरिक्त नवीन व अविभाज्य शर्तीने दिलेल्या भोगवटादार वर्ग-2 च्या इनामी/वतनी जमीनी भोगवटादार वर्ग-1 च्या करण्याबाबत दिनांक 09/07/2002 रोजीची सुधारणा.)

– 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
76 :thumbsup:
22 :heart:
1 :joy:
7 :heart_eyes:
5 :blush:
2 :cry:
0 :rage:

5 COMMENTS

 1. सर माझी जमीन वर्ग २ आहे ती वर्ग १ करायची आहे पन त्या अधिकार अभिलेखात कूळ आहे पन चेकबंदी ७/१२ वर कूळ नाही

 2. सर आमची जमीन वर्ग 2 होती
  1981 ला आदेश काढून
  व रीत सर चलन भरन
  वर्ग 1करनेत आली
  आता परत 2016ला तळटी ऑफिस मधून वर्ग 2केली
  आनी परत चलन भरवे लागेल
  असे सागने आहे
  तरी काय करावे…

 3. भोगवतदार वर्ग एक साठी लागणारी कागतपत्र व किती वेळ लागतो

 4. सर माझा भाऊ याचा अपघात झाला होता वा आम्हाला 12लाख चुकवा लागतात .आम्ही कुळ कायदा सेती वीक्री साठी परमिशन साठी तहशील दार वा sdo कडे खूप दिवसापासून चाक्कर काटात आहे .ते म्हणतात 10वर्ष विकता येत नाही मग आम्ही काय मरायचं का आता .याचा जबाबदार कोण राहील बस हेच विनंती करत आहो साहेब .माझी आई आजार पानात आहे

 5. आमची जमींन भोगवतदार 1 ची होती पंजबराव कृषि विद्यापीठ अकोला यांनी 1970-71 ला संपादन केली नंतर मोबधल्यात भोगवटदआर -2 ची जमींन मिळाली आता भोगवतदार -1 मधे करवायाची काय करावे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)