नवीन वर्षांतले पहिले चंद्र ग्रहण आज !

नवीन वर्षांतले पहिले चंद्र ग्रहण आज पडणार असून,हे ग्रहण भारतात दिसणार नाही. या संपूर्ण वर्षात ऐकून तीन सूर्य ग्रहण आणि दोन चंद्र ग्रहण दिसून येणार आहेत.  तसेच यातील फक्त दोनच ग्रहण भारतामध्ये दिसणार आहेत. आज (६ जानेवारी) ला होणारे सूर्य ग्रहण भारतातील लोकांना दिसणार नाही. आणि त्यानंतरचे २१ जानेवारीचे चंद्र ग्रहण सुद्धा भारतात दिसणार नाही.

जानेवारी नंतर जुलै मध्ये ग्रहण होणार असून, २जुलै ला सूर्य ग्रहण आणि १६ जुलै ला चंद्र ग्रहण होणार आहेत. २६ डिसेंबरला या वर्षातील शेवटचे आणि तिसरे ग्रहण होणार आहे. आणि हे ग्रहण भारतातील लोकांना पाहता येणार आहे.
भारतात ग्रहणाबाबत फार जास्त प्रमाणात गैरसमज आणि  अंधश्रद्धा आहे. गर्भवती महिलांनी ग्रहण बघू नये. तसेच  ग्रहणात काहीही खाऊ नये याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. अनेक जणांना ग्रहणाच्या कालावधीत खाल्लेले आहे. त्यांना काहीही झालेले नाही. या अंधश्रद्धाना दूर ठेवून  याची अचूक  माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
187 :thumbsup:
152 :heart:
152 :joy:
156 :heart_eyes:
151 :blush:
152 :cry:
156 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)