नवीन भरती येण्याकरिता…

मंडळी, आपल्याला हापूस आंब्याची पेटी घ्यायची असते…

विक्रेता पेटीतील पेंढा हलकासाच बाजूला करुन वरचेच एक रसरशींत, मोठ्ठे फळ आपल्याला नमुना म्हणून हातांत देतो. पण खरा चाणाक्ष ग्राहक त्या एका फळाच्या रंगरुपावर विसंबून आख्खी पेटी कधीच घेत नाही. तो पेटीतील सर्व नव्हे, पण बाकीच्या, तळांतील किमान एखाद दुसऱ्या फळांचाही अंदाज घेतो. केवळ निर्देशांकाकडे बघून बाजारातील तेजी/मंदीविषयक अंदाज बांधणे म्हणजे एका फळाच्या रुपावरुन पुर्ण पेटी खरेदी करण्याचा धोका पत्करणे होय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता हेच पहा ना. जानेवारी महिन्यांत (‘Calendar Year..’हा अधिक भारदस्त शब्द) आपला ‘निफ्टी’ जवळपास 100 अंकांनी वधारलाय खरा,पण येथे मेख अशी की या सेंच्युरीतील जवळपास 95 अंकाची भर, ही एकट्या ‘रिलायन्स’ च्या घोडदौडीमुळे पडली आहे.

तेव्हा ‘शीतावरुन भाताची’. भले होतही असेल, पण, निर्देशांकावरुन बाजाराची परीक्षा करणे धोक्याचेच ठरेल. आणखी एक जाणवलेली गोष्ट. निफ्टीने (फ्युचर्स) ऑक्टोबर 2018 मध्ये गाठलेली सर्वोच्च पातळी होती 11,090. त्याच्याच पुढच्याच महिन्यांत, (नोव्हेंबर) ती 10,949.8 राहिली. डिसेंबरमधील ऊच्चांक 11,006.3 होता. आणि निर्देशांक आतापावेतो 11,003.5 येथपर्यंतच मजल मारु शकला आहे. अर्थ स्पष्ट आहे. नवीन भरती येण्याकरिता, ( ती येतेच..) थोडा वेळ द्यावाच लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)