नवीन निकषांमुळे अवघड शाळा होणार सोप्या

संग्रहित फोटो

जुन्नर- पुणे जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांचे निश्‍चित केलेल्या निकषांच्या आधारे फेरसर्वेक्षण करून सुधारित शाळांची यादी सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. या नवीन फेरतपासणीच्या निकषांमुळे अनेक अवघड शाळा सोप्या क्षेत्रात येणार असल्याचे जाणकार सांगतात. याबाबतची तपासणी आणि चौकशी करण्याचे अधिकार बांधकाम विभागाला देण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी 15 नोव्हेंबरपर्यंत सुधारित याद्या जिल्हा परिषदेकडे देणार आहेत.
बारमाही रस्त्याची सुविधा, शाळेचे रस्त्यापासूनचे अंतर, डोंगरी भागांतील शाळा, नाले-ओढे पार करून जावे लागणारी शाळा आदी निकषांच्या आधारे सुधारित यादी जाहीर होणार असल्याचे जुन्नर गटशिक्षण अधिकारी पी. एस. मेमाणे यांनी सांगितले. जुन्नर तालुक्‍यात 135 आदिवासी अवघड आणि अवघड शाळा असून, नवीन निकषांमुळे या भागांतील शिक्षकवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. पुन्हा जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षकांना बदलीला सामोरे जाण्याची शक्‍यता शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सत्यवान म्हस्के यांनी वर्तवली. शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे आणि सततच्या बदल्यांमुळे शिक्षकांच्या अध्यापन कार्यपद्धतीवर आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

  • गेल्या वर्षी झालेल्या ऑनलाइन बदल्यांमध्ये अनेक महिला आणि पुरुष शिक्षकांनी अवघड क्षेत्रातील शाळा निवडल्या होत्या; परंतु आता त्याच शाळा सोप्या झाल्यास या शिक्षकांच्या पुन्हा बदल्या होण्याची चिन्हे आहेत. एकदा बदली झाल्यावर किमान तीन ते पाच वर्षे शिक्षकांना सलग काम करण्याची संधी मिळाल्यास विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागत असते.
    – हनुमंत गोपाळे, सरचिटणीस शिक्षक संघ
  • अवघड शाळांबाबत सुधारित निकष लागू झाल्यानंतर शासनाने बदल्यांच्या धोरणात सुधारणा करणे आवश्‍यक असून या शाळा निवडीच्या नवीन पद्धतीमुळे शाळांचे योग्य प्रकारे वर्गीकरण होणार आहे
    – पी. एस. मेमाणे, गटशिक्षणाधिकारी, जुन्नर.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)