पुणे – मार्केट यार्डात नवीन डाळींब यार्ड उभारण्यासाठी बाजार समितीने निवडलेली जागा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे नवीन यार्ड उभारण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या जुन्या डाळींब यार्डातच व्यापार सुरू राहणार असल्याचे मुख्य प्रशासक बी.जे. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सध्या डाळिंबाचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर व्यापाऱ्यांकडून अतिरिक्त जागेची मागणी होऊ लागली आहे. त्यावर मार्केट यार्डातील जनावरांच्या बाजारामागील मोकळ्या जागेत नवीन डाळींब यार्ड उभारण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यात मागील तीन वर्षांची आवक पाहुन व्यापाऱ्यांना जागा वाटप करून एकत्रित बांधकाम करण्याचा निर्णय अंतिम झाला. मात्र, ही जागा न्यायप्रविष्ट असल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर प्रशासनाने बांधकाम थांबविले. शुक्रवारी या विषयावर समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख, आडते असोसिएशन पदाधिकारी आणि डाळींब व्यापारी यांची बैठक झाली. यात हा निर्णय झाला.

संबंधित जागा न्यायप्रविष्ट असल्याने त्या जागेवर डाळिंब यार्डसाठी समिती परवानगी देऊ शकत नाही. यासाठी आडते असोसिएशन आणि डाळिंब व्यापाऱ्यांनी पणनमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार पणनमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या भुमिकेनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या तरी आहे, जुन्या डाळिंब यार्डातच व्यापार चालणार आहे. – बी.जे. देशमुख, मुख्य प्रशासक, बाजार समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)