नवीन ट्रांसफार्मर बसवल्याने शेतकरी आनंदात

जोगवडी- भोर तालुक्‍यातील नीरा नदीच्या काठी माळवाडी गावाजवळ ट्रांसफार्मर जळाल्याने शेती सिंचनासाठी पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. पाण्याविना पिके जळण्याच्या मार्गावर असताना शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे ट्रांसफार्मर बसविण्याचे मागणी केली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी त्वरित नवीन ट्रांसफार्मर बसविल्यामुळे शेतकरी वर्गाचे आर्थिक नुकसान टळले असून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
माळवाडी गावाजवळ महावितरणने शेती सिंचनासाठी स्वतंत्र ट्रांसफार्मर बसविला आहे. यावर 10 कनेक्‍शन असून वीस ते बावीस एकर क्षेत्र शेती सिंचनासाठी येत आहे. या क्षेत्रात ऊस, कांदा, घेवडा ही पिके लावण्यात आली असून जनावरांसाठी हत्ती गवत लावण्यात आले आहे. ट्रांसफार्मर जळाल्यामुळे ही पिके जळू लागली होती. तसेच हत्ती गवतही पिवळे पडू लागले होते. यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होणार होता. तसेच शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे राहणार होते.
पिकांसाठी घेतलेले कर्ज आम्ही कसे फेडणार या चिंतेत शेतकरीवर्ग होता. संबंधित शेतकऱ्यांनी आपली समस्या महावितरणचे अधिकारी कार्यकारी अभियंता संतोष चव्हाण, कनिष्ठ अभियंता विजय होळकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दक्षता घेऊन नवीन ट्रांसफार्मर बसविण्याची सूचना केली. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून आर्थिक संकटातून बचाव झाल्याने त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांचे आभार मानले.

यावर्षी खरीप हंगामात सलग सव्वा दोन महिने विश्रांती न घेता पाऊस झाल्याने पिके धोक्‍यात आली आहेत. या नुकसानी बरोबरच दुर्दैवाने ट्रांसफार्मर जळाल्यामुळे आमची पिके जळण्याच्या मार्गावर होती. आम्ही पिकांसाठी घेतलेले कर्ज कसे फेडणार या चिंतेत होतो; परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्वरित नवीन ट्रांसफार्मर बसविल्यामुळे आमच्यावरचे संकट टळले आहे.
शांताराम बांदल, शेतकरी संगमनेर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)