नवीन टर्मिनलचा मार्ग मोकळा

लोहगाव विमानतळावरील “कार्गो’सेवेचे “बीएसओ’ यार्ड स्थलांतर

पुणे – लोहगाव विमानतळावरील “कार्गो’ सेवा अर्थात मालवाहतुकीचे स्थलांतर सध्या मोकळ्या असलेल्या बरॅक स्टोअर ऑफिसच्या (बीएसओ यार्ड) जागेत करण्यात येणार आहे. कार्गो स्थलांतरामुळे लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नुकतीच दिल्ली येथे संरक्षणमंत्री निर्मला सितारामन, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

विमानतळ परिसरातील बीएसओ यार्ड (बरॅक स्टोअर ऑफिस) आणि सीडब्ल्यूई ऑफिस (कमांडर वर्क्‍स इंजिनिअर ऑफिस) हे नवीन जागेत हलविण्यात यावे. त्यासाठी राज्य शासनाने हवाई दल व विमानतळ प्राधिकरणास जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी, अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली. तोपर्यंत सध्या मोकळ्या असलेल्या बीएसओ यार्डाच्या जागेत मालवाहतूक स्थलांतरीत करण्यात येणार आहे. विमानतळावरील मालवाहतुकीचे स्थलांतर विमानांच्या हॅंगर्सच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत करावे, अशीही मागणी असून त्यासाठी औपचारिक प्रस्ताव पाठवून त्यावर निर्णय होणार आहे.

चांदणी चौक उड्डाणपुलाविषयी चर्चा
चांदणी चौक उड्डाणपुलाविषयीही या बैठकीत चर्चा झाली असून त्यानुसार चांदणी चौक ते एनडीएकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या उड्डाणपूल प्रकल्पासाठी राष्ट्रीय महामार्गाची जागा गृहीत धरून एकूण 31.11 हेक्‍टर जागा लागणार आहे. यापैकी 29.14 हेक्‍टर जागेचा ताबा प्राप्त झाला आहे. तर, राष्ट्रीय महामार्गाची जागा विचारात न घेता 17.91 हेक्‍टर क्षेत्रापैकी 15.94 हेक्‍टर क्षेत्राचा ताबा प्राप्त झाला आहे. यातील चांदणी चौक ते एनडीएकडे जाणाऱ्या रस्त्यावर 0.48 आर क्षेत्रावर प्रत्यक्ष काम करण्याची मान्यता आवश्‍यक होती. ती मान्यता संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)