नवीन झाडे लावण्यासाठी जुनी झाडे तोडा

 ग्रामीण रुग्णालयामधील पंधरा ते वीस वर्षा ची कापलेली झाडे. 

ग्रामीण रुग्णालयाचा उपक्रम..?
दहिवडी, दि. 8 (प्रतिनिधी) – वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाने व्यापक जनजागृती करून 50 कोटींची वृक्षलागवड करण्याचा मानस शासन राबवत आहे. त्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपये देखील खर्ची घातले आहेत. मात्र हे होत असताना दहिवडी ग्रामीण रुग्णालय येथील सुमारे साठ ते सत्तर झाडांची कत्तल केली आहे. या संदर्भात माहिती घेतली असता यामध्ये नवीन झाडे लावण्यासाठी जुनी झाडे तोडली आहेत व हा निर्णय वरिष्ठ अधिकारी यांनी घेतला आहे. त्यामुळे कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नसल्याचा खुलासा ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी करत आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सुबाभूळ, निलगिरी, गुलमोहर, लिंब अशा अनेक प्रकारच्या झाडांची तोड मक्तेदार यांच्याकडून करण्यात आली आहे. याबाबत घटनास्थळी वनविभाग, पोलिस प्रशासन आणि नगरपंचायतमधून कोणही अधिकारी फिरकला नसल्याची माहिती नागरिक देत आहेत. यासंदर्भात ही झाडे तोडण्यासाठी परवानगी घेतली का यांची माहिती नगरपंचायत व वनविभाग यांच्याकडून विचारली असता आम्ही परवानगी दिली नाही असे मुख्याधिकारी, व तालुका वनाधिकारी सांगत आहेत. मग त्या ठिकाणी झाडे तोडणारं नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. वनविभागाचे अधिकारी आठ ते दहा दिवसापासून याची माहिती घेऊ, पंचनामे करू अशी उत्तर देत असताना अचानकपणे म्हणतात की हा विषय आमचा नाही नगरपंचायतीकडे येतो मग पंचनामे करण्याचे आश्वासन नागरिकांना कसे दिले? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. वास्तविक हे वृक्ष तोडण्यापूर्वी नगरपंचायतीची परवानगी आवश्‍यक होती. मात्र केलेली वृक्षतोड बेकायदेशीर असून याबाबत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वृक्ष प्रेमी मधून होत आहे.

ग्रामीण रुग्णालय दहिवडी मधील वृक्ष तोडी संदर्भात आम्ही पत्र देणार आहोत. मात्र हा विभाग नगरपंचायतच्या ताब्यात असल्याने आम्ही यावरती काही कारवाई करू शकत नाही व गुन्हा दाखल करू शकत नाही.
एस. के. पाटील वनाधिकारी

-Ads-

नगरपंचायतीची परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र त्यांनी परवानगी घेतली नाही. त्यामुळे तुम्ही लेखी अर्ज द्या आम्ही कारवाई करू तसेच हे प्रश्न वनविभागाचे आहेत ते पंचनामे व कारवाई करतील.
कपिल जगताप, मुख्याधिकारी, दहिवडी नगरपंचायत

वृक्ष तोड करणारे अधिकारी व मक्तेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही पोलिस स्टेशन, वनविभाग या ठिकाणी अर्ज दिले आहेत. मात्र संबंधित प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई व पंचनामे केले नाहीत यामुळे याचा मुख्यसूत्रधार कोण याची चौकशी होणे गरजेचे आहे.
अभिजीत नायसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)