नवीन ग्राहक बॅंकांकडे आकर्षित करणे आव्हान – लांडे

पिंपरी – ग्राहक सेवेला बॅंकींग क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्याचा असणारा ग्राहक टिकवणे, स्पर्धात्मक युगात नवीन ग्राहक बॅंकेकडे आकर्षित करणे, हे मोठे आव्हान बॅंकांसमोर आहे, असे प्रतिपादन अण्णासाहेब मगर बॅंकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी केले.

अण्णासाहेब मगर सहकारी बॅंकेची 19 वी वार्षिक सभा भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात शांततेत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानाहून नंदकुमार लांडे बोलत होते. माजी आमदार सोपान फुगे, उद्योगपती लक्ष्मण काचोळे, माजी नगरसेवक निलेश पांढारकर, विलास खांदवे, भाऊसाहेब लांडे, शामराव लांडगे, सदाशिव बोऱ्हाडे, बॅंकेचे उपाध्यक्ष विठ्‌ठल सांडभोर, ऍड. घनशाम खलाटे, सुलोचना भोवरे, ऍड. बाळासाहेब थोपटे, सोनल लांडगे, शंकर मेटकरी, मनोज बोरसे, गणेश पवळे, विजय गवारे, राजेश सस्ते, दीपक डोळस, अमेय दर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

-Ads-

वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विषय पत्रिकेवरील सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात एकमताने मंजूर झाले. बॅंकेचे सभासद, ठेवीदारांचा संचालक मंडळावर असणारा विश्‍वास, सभासद, खातेदारांचे सहकार्य, सर्व संचालकांचा व सेवकांचा सहभाग यामुळेच बॅंकेची प्रगती करणे साध्य झाल्याचे नंदकुमार लांडे यांनी नमूद केले. बॅंकेच्या मार्च 2018 अखेर ठेवी रक्कम 204 कोटी 62 लाख असून कर्जवाटप 114 कोटी 26 लाख आहे. बॅंकेची एकूण गुंतवणूक 94 कोटी 20 लाख असून भाग भांडवल 8 कोटी 75 लाख असल्याची माहिती त्यांनी दिली.

बॅंकेचे सभासद माजी नगरसेवक शंकरराव पांढरकर, आनंदा यादव, अशोक ढोबळे, संतोष धर्मावत, प्रशांत घुंडरे, भाऊसाहेब कोकाटे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी यांनी केले. संचालक राजेश सस्ते यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)