कापूरहोळ- भोर तालुका वन खाते कर्मचार सहकरी पतसंस्था आणि भोर व वन अधिकारी यांच्या सहकार्याने वेल्हे तालुक्‍यातील अतिदुर्गम भागातील पासली, बालवड, केळद, खोपडेवाडी या गावातील अंगणवाडीतील मुलांना गणपती आगमनाचे औचित्य साधून पासली येथे 110 गणवेश वाटप करण्यात आले. गणवेश वाटपासाठी किशोर येळे, उपविभागीय वन अधिकारी – भोर, इरफान मुलाणी, वन परिक्षेत्र अधिकारी, वेल्हे, अनिल लांडगे, वन परिक्षेत्र अधिकारी – नसरापूर, संस्थेचे अध्यक्ष पंडित गायकवाड, सचिव लक्ष्मण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते आनंदराव सणस, सरपंच, पालक, अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)