नवीन काय वाचाल?

   कला आणि राष्ट्रविचार : अदिती जोगळेकर-हर्डीकर

भारतीय कलेचा इतिहास आणि भारतीय कलेची समीक्षा याकडे कालानुक्रमे पाहिलं असता, “कला समीक्षक’ म्हणून लेखन करणाऱ्या निवेदिता बहुधा पहिल्या भारतीय महिला ठराव्यात. त्यांना चित्रकला, शिल्पकला अत्यंत प्रिय होती. त्यांनी चित्र, शिल्प समीक्षा केवळ आस्वादकाच्या भूमिकेतून केलेली नाही.

निवेदिता यांनी म्हटले, “आपले राष्ट्रीय आदर्श, कला, संस्कृती, इतिहास, साहित्य अशा अभिमान वाटणाऱ्या गोष्टी आपल्यापाशी असताना आपण आपलं अस्सल ते सोडून इतरांचं अनुकरण करत बसणार? भारतानं आपल्या वर्तमान आणि भविष्याबद्दल विचार करण्याची वेळ आता आली आहे. म्हणूनच त्या म्हणत, “टीच इंडिया टु थिंक ट्रुली अबाऊट हरसेल्फ. धिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टू द एण्डस आय होप फॉर.’ पुढे त्यांनी म्हटलंय, “भारतीय कलेला तिचं गतवैभव परत मिळावं आणि भारतीय कलेचा आधुनिक भारतात जणू पुनर्जन्म व्हा, हे माझं सर्वात लाडकं स्वप्न आहे असं निवेदिता म्हणत.

युरोपियन अमलाखाली प्राचीन भारतीय कलेचा विसर पडत चाललेल्या काळात भारतात कलेच्या क्षेत्रात काय बदल व्हायला हवेत याची मांडणी सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण रितीने निवेदितांनी केली. या पुस्तकात अत्यंत दुर्मिळ पेन्टींग, चित्रे इत्यादींचा समावेश आहे. भगिनी निवेदितांनी वर्णन केलेली परिस्थिती आजही फारशी बदललेली नाही, हे मात्र निश्‍चित.

अदिती जोगळेकर-हर्डीकर, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)