नवीन काय वाचाल?

  चैत्रपालवी सरता सरता… आशिष नांदगावकर

व्यवसायाने इंटेरियर डेकोरेटर आणि आर्किटेक्‍ट असूनही संवेदनशील कवितेचा आविष्कार घडवत मानवी मनाची स्पंदने टिपणाऱ्या आशिष नांदगावकर यांच्या कवितांचा संग्रह, “चैत्रपालवी सरता सरता…’ या नावाने सोलापूरच्या साद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. कवीच्या निधनानंतर हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठी कवीच्या कुटुंबीयांनी विशेष मेहनत घेतली आहे. या संग्रहातील कविता या कवीच्याच हस्ताक्षरात प्रसिद्ध करण्यात आल्या असून मुखपृष्ठही लक्षवेधी असे झाले आहे. स्त्री-पुरुष नात्याचा वेध घेणारी नांदगावकर यांची कविता कमालीची चित्रदर्शी असून मराठी भाषेमध्ये एका नव्या वळणाची कविता म्हणून या कवितेचा उल्लेख करावा लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नांदगावकरांच्या कवितेत पुरुषाची वेदना, दु:ख अतिशय प्रभावीपणे चित्रित झाल्याचं आढळतं. पुरुषामध्ये दडलेली स्त्री, बापामध्ये दडलेली आई, प्रियकरामध्ये दडलेली प्रेयसी व्यक्‍त होत असताना या रचनांमध्ये उतरलेला बेभानपणा विलक्षण मनोहारी आणि प्रत्ययकारी आहे. सहजपणे अनुकरण करता येणार नाही, अशा शैलीमध्ये अभिरुचीचे अवमूल्यन होण्याच्या काळात स्वयंतेजाने तळपणारी आणि वाचकाला अधिक प्रगल्भ करणारी ही कविता आहे. या कवितेचे स्वागत मराठी कवितारसिक नक्की करतील आणि छोटेखानी असलेले हे पुस्तक जरुर संग्रही बाळगतील.

चैत्रपालवी सरता सरता… आशिष नांदगावकर, साद प्रकाशन, सोलापूर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)