माझा धनगरवाडा- धनंजय धुरगुडे (नवीन काय वाचाल?)

शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं, असा निश्‍चय करतो. बापाचं हे उराशी घेतलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या धनगरवाड्यातलंच एक कोकरू बिचकत बिचकत, कळप सोडून, शाळेत जाऊ लागतं. वादळवारा असो, वा सतत बदलणारा मुक्काम, काबाडकष्ट करून ते आपलं शालेय शिक्षण पूर्ण करतं. नंतर शहरामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतं. शिक्षणासाठी प्रसंगी मोलमजुरी करून “बापाचं स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी स्वत:चा निर्धार कायम ठेवतं आणि स्वत:च स्वत:ला सतत प्रेरित करत राहातं.

आत्मभान जागृत झालेल्या धनंजय धुरगुडे या पश्‍चिम महाराष्ट्रातल्या एका धनगर समाजाच्या घटकाचं “माझा धनगरवाडा’ हे आत्मचरित्र विलक्षण प्रत्ययकारी असं उतरलं आहे. सातारा जिल्ह्यातल्या एका लहानशा गावातून सतत वेगवेगळ्या पाड्यांवर रहाणं, आयुष्यात असलेली अस्थिरता आणि शिक्षण घेण्याविषयीची प्रचंड आंतरिक ऊर्जा याविषयीची ही कहाणी मुळापासूनच वाचण्याजोगी आहे.

सातारा येथील होस्टेलमधील दिवस, शहरी मुलांसमोर वारताना येणारा बुजरेपणा आणि दोन भिन्न समाज-संस्कृंतींमधील बारीकसारीक फरक, भाषेचा बाज या सर्व गोष्टी विचारात घेता, या पुस्तकाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे, असं म्हणता येईल.

प्रकाशक- रोहन प्रकाशन, पुणे, किंमत : रु. 400.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)