नवीन काय वाचाल?

वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी : राजेंद्र थोरात

महाराष्ट्राला संतांची आणि समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. अनेकदा संत चरित्रांचा अभ्यास करताना उपलब्ध साधनसामग्री आणि त्या संताच्या रचना यांचाच वेध घ्यावा लागतो. मात्र, आजवर संतांचं चैत्र कादंबरीच्या माध्यमातून कोणी मांडलं नव्हतं. ते संत साहित्याचे अभ्यासक राजेंद्र थोरात यांनी मांडलं आहे, “वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी’ या पुस्तकातून. वारकरी संतांचे जीवनचरित्र कादंबरी या साहित्यप्रकारातून लेखकाने अतीव आदर आणि श्रद्धेतून सुलभतेने चित्रीत केले आहे. प्राचीन काळापासून समृद्धपणे बहरत असलेल्या विविध संतांच्या चरित्रांमधून लेखकाला प्रेरणा मिळाल्याचे त्याने प्रांजळपणे कबूल केले आहे.

आजवर प्रामुख्याने संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर यांच्या चरित्रावरच कादंबरीमय लेखन झाले असल्याकडे लक्ष वेधून लेखक म्हणतो की, “मुंगी उडाली आकाशी,’ “इंद्रायणी काठी,’ “मोगरा फुलला,’ “नामाचा गजर,’ “एका जनार्दनी,’ “आनंद ओवरी,’ “तुका आकाशाएवढा,’ “महाद्वार,’ आणि “मुक्‍ताई’ अशा कादंबऱ्यांनी संतांचे जीवनचरित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकांनी वाचकांनाही प्रभावित केले आहे. तसेच मानवतावादी विशाल अंत:करणाचे वारकरी संत कादंबरीकारांनी कौशल्याने रेखाटले आहेत. या पुस्तकात थोरात यांनी या संपूर्ण संत परंपरेचा वेध घेतला असून विलक्षण सुंदर भाषा शैलीमध्ये संपूर्ण संतपरंपरेचा एक वेध एका व्यापक अंगाने घेतला आहे. आजवर प्रकाशित बहुतांश संत चरित्रात्मक कादंबऱ्यांचा वेध घेताना थोरात यांनी सारासार विचार आणि समतेचे तत्त्व अंगिकारल्याचे अनुभवास येते.

व्यंकटेश लिंबकर
वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी : संस्कृती प्रकाशन, पुणे. किंमत रु. 250/-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)