नवीन काय वाचाल?

अनोळखी विश्‍वाची मनोहारी सफर : कासवांचे बेट : डॉ. संदीप श्रोत्री

सातारा येथील ख्यातनाम शल्यविशारद आणि पर्यावरण चळवळीतले आघाडीचे कार्यकर्ते असलेल्या डॉ. संदीप श्रोत्री यांनी गॅलापोगास या उत्तर अमेरिकेतील बेटांविषयी लिहिलेले “कासवांचे बेट’ हे पुस्तक अत्यंत देखणे आणि वाचनीय असे ठरले आहे. मानवी उत्क्रांतीच्या शास्त्राचा जनक चार्ल्स डार्विनने ज्या बेटांना भेट दिल्यानंतर त्याला उत्क्रांतीचे तत्त्व उमगू लागल्याचे मानले जाते. त्यामुळे या बेटांनी जगाच्या मानववंशशास्त्राला एक नवे वळण दिल्याचे मानले जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुमारे 30 ते 40 लाख वर्षांपूर्वी ज्ञात झालेल्या अथवा अस्तित्त्वात आलेल्या या बेटांवर आजही असंख्य जिवंत ज्वालामुखी आहेत. त्यामुळे इथली जीवसृष्टी ही सर्वात विपरित स्थितीत टिकून राहिलेली जीवसृष्टी आहे, हे डॉ. श्रोत्री यांनी खुमासदार शैलीत पटवून दिले आहे. या बेटावर आढळणारी आणि किमान 200 वर्षांहून अधिक आयुष्यमान असलेली कासवे हे येथथीश्रल जीवसृष्टीचे खरे शिलेदार.

ही कासवे, त्यांचा अधिवास, जाती-प्रजाती आणि तेथील पर्यावरण, जीवसृष्टी याचा एक मनोहारी आलेख लेखकाने चिताला असून वाचकाला उत्कंठा निर्माण करणारी ओघवती निवेदनशैली आणि अत्यंत आकर्षक अशी मांडणी यामुळे हे पुस्तक पारंपरिक प्रवासवर्णन न ठरता, एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरते.
– व्यंकटेश लिंबकर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे. किंमत रु. 180/-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)