नवी दिल्ली: नवीन कायद्यानुसार शरीरसुखाची मागणी वा स्वीकार हा भ्रष्टाचारच असल्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. भ्रष्टाचार (निर्मूलन) सुधारणा कायदा 2018 नुसार कोणाही व्यक्तीबाबत लैंगिक पक्षपात हा देखील शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. कोणाकडे शारीरिक सुखाची मागणी करणे वा शारीरिक सुखाचा स्वीकार करणे यासाठी 7 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आलेली आहे.

भ्रष्टाचार विरोधी नवीन कायद्यात “अनुचित लाभा’ ची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. त्यानुसार रोख मोबदल्याऐवजी “सुखदायी’ सेवा, क्‍लबचे सदस्यत्व आणि चैनीच्या वस्तू यांचाही भ्रष्टाचारात समावेश करण्यात आला आहे. हा कायदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर जुलै महिन्यात अधिसूचित करण्यात आला आहे. 30 वर्षांपूर्वीच्या भ्रष्टाचार विरोधी कायद्याची जागा आता नवीन कायद्याने घेतली आहे. यौन संबंधाप्रमाणे एखाद्या नातेवाईकाला वा स्नेह्याला नोकरी देण्याची मागणी भ्रष्टाचार मानली जाणार असून त्यासाठी कारवाई करण्यात येईल. नवीन कायद्यात लाच घेणाऱ्याप्रमाणेच लाच देणाऱ्यालाही शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. पूर्वीच्या कायद्यात अशी तरतूद नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)