नवीन इमारतीत कौटुंबिक न्यायालयात दावे दाखल होण्याचे प्रमाण वाढले : वर्षात 3 हजार 797 दावे दाखल

पुणे – नवीन इमारतीत कौटुंबिक न्यायालय स्थलांतर झाल्यानंतर दाखल होणाऱ्या दाव्यांचे प्रमाण वाढले आहे. वर्षभराच्या कालावधीत 3 हजार 797 दावे दाखल झाले आहेत. नेहमीच्या तुलनेत सुमारे 15 टक्के दावे जास्त दाखल झाले आहेत.
शहरात 27 जानेवारी 1989 रोजी कौटुंबिक न्यायालय सुरू झाले. तेव्हापासून अलका टॉकीज चौकातील भारती विद्यापीठाच्या सातव्या आणि नवव्या मजल्यावर हे कौटुंबिक न्यायालय सुरू होते. त्यानंतर कौटुंबिक न्यायालयालाही स्वतंत्र्य इमारत असावी, अशी संकल्पना समोर आली. 2003 मध्ये पुणे जिल्हा बार असोसिएशनने याबाबत मागणी केली. ही मागणी वकिलांनी लावून धरली. राज्य सरकारनेही या मागणीची दखल घेतली. 2008 मध्ये शिवाजीनगर न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या गेटजवळ 39 गुंठे जागा देण्यात आली. 2009 मध्ये नवीन इमारतीचे भूमिपुजन झाले. तब्बल नऊ वर्षानंतर 2017 मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. 12 ऑगस्ट 2017 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते नवीन इमारतीचे उदघाटन झाले. 16 ऑगस्ट रोजी या नवीन इमारतीत कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजास सुरूवात झाली. नवीन इमारतीत कौटुंबिक न्यायालय स्थलांतर झाल्यापासून दाखल होणाऱ्या दाव्यांचे प्रमाण वाढले आहे. येथे परस्पर संमतीने घटस्फोट, एकतर्फी घटस्फोट, पोटगी मिळणे, थकलेली पोटगी मिळावी, मुलांचा ताबा, मुले सांभाळत नसल्यास ज्येष्ठ नागरिक दावा दाखल करत असतात. वाढत्या दाव्यांविषयी दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे म्हणाल्या की, नवीन कौटुंबिक न्यायालयात चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे तर खटला दाखल होण्याचे प्रमाण वाढलेच आहे. पण, त्याचबोरबरच समाजातील बदलत्या परिस्थितीमुळे दाखल होणाऱ्या दाव्यांचे प्रमाण वाढले आहे. सोशल मिडीयाचा वाढता वापर, निर्माण झालेली संशयी वृत्ती, इगो प्रॉब्लेम विशेषत: आयटी क्षेत्रातील लोक अधिक दावे दाखल करतात. बाहेरच्या लोकांनी संसारात केलेली ढवळाढवळीमुळे घटस्फोटांचे अर्ज दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. याविषयी बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या शिस्तपालन समितीचे माजी सदस्य ऍड. बिपीन पाटोळे म्हणाले, बदलत्या काळाचे प्रतिबिंब न्यायव्यवस्थेत उमटत आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या दाव्यांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी एकत्रित कुटुंब पध्दती होती. त्यावेळी पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यास घरातील ज्येष्ठ मंडळी समजावून सांगायची. विशेष म्हणजे दोघेही ते ऐकत होती. त्यामुळे वाद मिटले जायचे. मात्र, बदलत्या परिस्थितीमुळे आता विभक्त कुटुंब पध्दती रुढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ कारणावरून झालेले भांडण थेट न्यायालयात पोहोचते. त्यातच दोघेही स्वावलंबी असलेल्या कारणस्तव आणि इगोमुळे भर पडत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)