नविन जबाबदारी आनंदाने स्विकारतो : खलील अहमद 

लखनौ: भारतीय संघामधिल नविन डावखूरा वेगवान गोलंदाज खलील अहमदने एकदिवसीय सामन्यांनंतर टी-20 सामन्यांमध्ये पुन्हा एकदा सर्वांना प्रभावित केले असून विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने नव्या चेंडूने गोलंदाजी करताना विंडीजच्या सलामीवीरांना लवकर बाद करत आपण नवा चेंडू देखिल तितक्‍याच समर्थपणे हताळू शकतो हे सर्वांना दाखवून दिले असून नव्याचेंडूने गोलंदाजी करण्याच्या अनुभवा आणि जबाबदारी बद्दल त्याला प्रश्‍न विचारला असता त्याने आपण नविन जबाबदारी आनंदाने स्विकारतो आणि त्याचे कोणतेही दडपण आपल्यावर पडू देत नाहीत अशी प्रतिक्रीया दुसऱ्या सामन्यानंतर दिली आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात खलीलने नवीन चेंडू हाताळताना प्रभावी गोलंदाजी करताना विंडीजच्या फलंदाजांना बांधून ठेवण्यात यशस्वी झाला होता. यावेळी त्याने पहिल्या सामन्यात केवळ 16 धावांच्या बदल्यात विंडीजचा अखेरच्या फळीतील फलंदाज फॅबिएन ऍलनला बाद केले होते. त्यामुळे भारताला विंडीजच्या संघाला केवळ 109 धावांमध्येच रोखण्यात यश मिळाले होते. तर, दुसऱ्या सामन्यात खलीलने 30 धावांच्या मोबदल्यात विंडीजचे सलामीवीर शाई होप आणि शेमरॉन हेतमायरयांना बाद केले.

पहिल्या सामन्यात भारतीय संघ अनुभवी गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारच्या अनुपस्थितीत खेळत होता. त्यामुळे त्या सामन्यात खलीलने उमेश यादवच्या साथीत गोलंदाजीला सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात भुवनेश्‍वरच्या पुनरागमनानंतर खलील ऐवजी जसप्रीत बुमराहहा भुवनेश्‍वरसोबत गोलंदाजी करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, खलीलने सर्वांना चकीत करताना रोहित शर्माला विश्‍वासात घेऊन नविन चेंडूने दुसरे षटक टाकले आणि त्याने त्याच्यावर पडलेल्या जबाबदारीची पुर्तता करताना विंडीजचे एकदिवसीय मालिकेतील नायक शेमरॉन हेतमायर आणि शाई होप यांना स्वस्तात परतवताना भारतीय संघाच्या विजयाची खात्री निर्माण केली.

यावेळी बोलताना खलील म्हणाला की, आजच्या सामन्यात माझ्यावर महत्वाची जबाबदारी होती. कारन, आज पुन्हा मी नव्या चेंडूने गोअलंदाजी करायला उतरलो होते आणि माझ्या समोर हेतमायर आणि होप सारखे फलंदाज फलंदाजी करत होते. त्यामुळे त्या जबाबदारीचा दबाव जानवू न देता गोलंदाजी कीली. कारण जर मी दबावात गोलंदाजी केली असती तर मी दबावात चुका केल्या असत्या आणि आमच्या संघाला त्याचा तोटा झाला असता.
खलीलच्या संघातील सहभागाची चर्चा आशिया चषकाच्या वेळी झाली होती. मात्र, विंडीज विरुद्धच्या मालिकेतून तो प्रकाश झोतात आला. या मालिकेत त्याने 4 सामन्यांमध्ये सात विकेट्‌स घेतल्या होत्या.

त्यानी आपला हा फॉर्म टी-20 मालिकेतही कायम ठेवत आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये 3 बळी मिळवले आहेत. यावेळी खलीलने आपल्या यशाचे श्रेय हे आयपीएलला दिले असून गत मोसमात खलील हा सनरायजर्स हैदराबादच्या संघाकडून आयपीएल मध्ये खेळला होता. यावेळी बोलताना खलील म्हणाला की, मी आयपीएलच्या वेळी दिग्गज गोलंदाज आणि खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर केल्याचा फायदा माझी गोलंदाजी सुधारण्यात झाला आहे असेही त्याने यावेळी सांगितले.

तसेच यावेळी तो म्हणाला की, आयपीएल सारख्या स्पर्धेत तुम्ही खेलता तेंव्हा तुम्ही एकप्रकारे अंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतच खेळता त्यामुळे तुम्हाला तुमच्या शैली मध्ये जास्त बदल करावा लागत नाही आणि तुम्हाला कशी गोलंदाजी करायची याचा अंदाजही त्यावेळी आलेला असतो त्यामुळे तुम्हाला फक्त दबाव न घेता तुम्हाला दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडायची असते असेही तो म्हणाला.

वेस्ट इंडीजच्या संघात प्रतिभावान खेळाडूंचा भरणा – लॉ 
वेस्त इंडीजच्या संघात सध्या नविन खेलाडू असलेल्‌ तरी त्यांच्यात प्रतिभेची कमतरता आहे असे म्हणता येणार नाही त्यामुळे त्यांच्या संघात पुरते प्रतिभावान खेळाडू असून जसा जसा अनुभव येत जाईल तसा तसा त्यांचा खेळ सुधारत जाईल असे विधान विंडीजच्या संघाचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांनी केले आहे. विंडीजचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी कसोटी मालिका 2-0, एकदिवसीय मालिका 3-1 आणि टी-20 मालिकेत 2-0 असा पराभव स्विकारल्यानंतर विंडीजच्या संघावर सगळी कडून टिका होत असताना त्यांचे प्रशिक्षक लॉयांचे हे विधान महत्वपूर्ण माणले जात आहे.

भारत दौऱ्यानंतर विंडीजचा संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार असून त्या दौऱ्यानंतर लॉहे विंदीजच्या संघाचे प्रशिक्षक नसणार आहेत. त्यानंतर लॉहे इंग्लंडचा स्थानिक संघ ससेक्‍सचे प्रशिक्षकपद स्विकारणार आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमचा संघहा सर्व नविन खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे त्यामुळे आमचा संघ अपेक्षे पेक्षा चांगली कामगिरी करतो आहे. त्यांना जशी जशी संधी मिळेल तशी तशी त्यांच्या कामगिरीत सुधारना होताना दिसेलअसेही ते यावेळी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)