नवाज शरीफ यांना आणखी एक झटका

पाक सरकारने संपूर्ण सुरक्षा हटवली
इस्लामाबाद  : पाकिस्तानच्या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासकीय पदांवर नसलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेतील तब्बल 13 हजार 600 पोलिसांना परत बोलावले आहे. सुरक्षा हटवण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा देखील समावेश आहे. पदांवर नसलेल्या व्यक्तींना मिळालेली सुरक्षा मागे घेतली जावी, असा आदेश पाकिस्तानचे सरन्यायाधीश मियां साकिब निसार यांनी दिला होता. या आदेशाचे पालन करत प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था मागे घेतली आहे.
केंद्रीय आणि प्रांतीय सरकारांच्या या निर्णयामुळे अनेक राजकीय नेत्यांवर प्रभाव पडणार आहेत. नवाज शरीफ, माजी गृहमंत्री आफताब शेरपाओ, जमियत-उलेमा-ए-इस्लाम फजल संघटनेचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान, अवामी नॅशनल पार्टीचे असफंदीयार वाली खान समवेत पोलीस अधिकारी, पत्रकार, अधिकारी आणि न्यायाधीशांचा यात समावेश असल्याचे समजते. नवाज शरीफ यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाल्यास यासाठी सरन्यायाधीशच जबाबदार असतील, असे नवाज यांच्या कन्या मरियम यांनी म्हटले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)