लंडन: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची पत्नी बेगम कुलसुम (68) यांचा लंडनमधील हर्ले स्ट्रीट्‌ क्‍लीनिकमध्ये मृत्यू झाला. गळ्याचा कॅन्सर झालेल्या बेगम कुलसुमवर लंडनमध्ये 2014 पासून उपचार चालू होते. कुलसुम नवाज यांना गळ्याचा कॅन्सर असल्याचे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात समजले होते.

एका काश्‍मिरी परिवारात 1950 साली जन्मलेल्या कुलसुमचा 1971 साली नवाज शरीफ यांच्याशी विवाह झाला होता. नवाज दांपत्याला हसन, हुसेन, मरियम आणि अस्मा अशी चार अपत्ये आहेत. पनामा पेपर्स प्रकरणामुळे अपात्र ठरलेल्या नवाज शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागल्यानंतर त्यांच्या जागी बेगम कुलसुम निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. मात्र विजयी होऊनही आजारपणामुळे त्यांना स्वदेशात येता आले नाही आणि खासदारकीची शपथही घेता आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)