नवाज शरीफ यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा पाकिस्तान सरकारने काढून घेतली

इस्लामाबाद (पाकिस्तान) -पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा पाकिस्तान सरकारने  काढून घेतली आहे. या निर्णयामुळे 13,600 सुरक्षाकर्मींना त्यांच्या सुरक्षा ड्युटीवरून परत बोलावण्यात आले आहे. पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश मियां जाकिब निस्सार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

प्रभावशाली, परंतु सरकारी सुरक्षा मिळण्यास पात्र नसलेल्या सर्व व्यक्तींना देण्यात आलेली सुरक्षा 24 तासांच्या आत काढून घ्यावी असे आदेश न्यायमूर्ती मियां जाकिब निस्सार यांनी 19 एप्रिल रोजी सर्व प्रांतीय आणि विभागीय सरकारांना दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी करून अशा सर्व नेत्यांचे सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे नवाज शरीफ यांच्या जिवाला काही धोका झाल्यास त्याला मुख्य न्यायाधीश जबाबदार असतील असे नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांनी म्हटले आहे.

सुरक्षा काढून घेण्याच्या या निर्णयाचा परिणाम नवाज शरीफ यांच्याप्रमाणेच माजी गृहमंत्री आफताब शेरपाओ, जमियत ए इस्लाम फजलचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान, आवामी नॅशनल पार्टीचे प्रमुख असफंदीयार वाली खान यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी, नोकरशहा, न्यायाधीश आदींवर होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)