नवाज शरीफ यांच्यावर उपचारा करणाऱ्या डॉक्‍टरांचा मृत्यू

पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नवाज शरीफ सध्या रावळपिंडी येथील आदियाला तुरुंगात कैदेत आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टर्सच्या टीमचे डॉ. एजाज कादरी प्रमुख होते. त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. डॉ. एजाज कादरी यांना यापूर्वीही हृदयविकाराचा झटका आला होता.

डॉ. एजाज कादरी हे पाकिस्तान आयुर्वेद संस्थेत काम करत होते. तुरुंगात असलेल्या नवाज शरीफ यांची तब्येत बिधडल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी मेडिकल बोर्ड स्थापन करण्यात आले होते. त्यात डॉ. एजाज कादरी यांच्याबरोबरच डॉ. नईस मलिक, डॉ. शाजी सिद्दीकी, डॉ. सोहेल तनवीर आणि डॉ. मसूद यांचा समावेश आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)