नवाज शरीफ, मुलगी मरियमला विमानतळावर उतरताच अटक

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम शरीफ यांना लाहोर विमानतळावर उतरताच अटक करण्यात आली आहे. इथून त्यांना हेलीकॉप्टरने इस्लामाबादला नेले जाईल आणि तिथून रावळपिंडी जेलमध्ये पाठवले जाणार आहे.

नवाज शरीफ लंडनहून अबुधाबीमार्गे लाहोरला पोहोचले. पाकिस्तानमधील एका कोर्टाने नवाज शरीफ यांना दहा वर्षांचा, तर मरियम शरीफला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमध्ये याच महिन्यात 25 तारखेला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मरियम लाहोरमधून निवडणूक लढत आहे.

नवाज आणि त्यांच्या मुलीला अटक करण्यासाठी लाहोर विमानतळावर 10 हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. नवाज यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग म्हणजेच पीएमएलच्या समर्थकांना रोखण्यासाठी आणि तणावाला हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली. याशिवाय पीएमएलच्या 300 समर्थकांना अटकही करण्यात आली.

गेल्या आठवड्यात नवाज शरीफ आणि मुलगी मरियम यांना पाकिस्तानमधील एका कोर्टाने लंडनच्या ऐवनफिल्ड प्रकरणात  दोषी ठरवलं आणि दोघांनाही अनुक्रमे 10 आणि सात वर्षांची शिक्षा सुनावली. कोर्टाने मरियम यांचे पती कॅप्टन (निवृत्त) सफदर यांनाही एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कोर्टाने 100 पानी निर्णयात नवाज यांना एक कोटी डॉलर, तर मुलीला 26 लाख डॉलरचा दंडही ठोठावला.

पनामा गेट प्रकरणी नवाज शरीफ यांच्याविरोधात तीन खटले दाखल आहेत. ज्यापैकी एक लंडनमधील ऐवनफील्ड अपार्टमेंटसंबंधित आहे. याच प्रकरणात दोघांनाही शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने हे अपार्टमेंट जप्त करण्याचे आदेशही दिला आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)