नवाज शरीफ गेले लंडनला 

लाहोर – पाकिस्तानातील न्यायालयाने त्या देशाचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना निवडणुक लढवण्यास कायमचे अपात्र ठरवल्यानंतर शरीफ यांनी आपला पाकिस्तानातील मुक्काम हलवला असून ते आता लंडनला गेले आहेत. ते आता तेथून परत येण्याची शक्‍यता नाही असे सांगितले जात आहे. तथापी आपण आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी जात असल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे.

मात्र ते लंडनहून पाकिस्तानला परत कधी येतील याची कोणतीही माहिती त्यांच्या प्रवकत्यांनी दिलेली नाही. शरीफ यांच्या विरोधात अजून भ्रष्टाचाराचे तीन खटले तेथे प्रलंबीत आहेत. त्यांना त्यासाठी नॅशनल अकाऊंटीबिलिटी ब्युरोने समन्स बजावले असून त्यांना 21 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ही चौकशी टाळण्यासाठी त्यांनी पलायन केले असल्याची तेथे वदंता आहे. तथापी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले की त्यांच्या पत्नी कुलसुम या लंडन येथे रूग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर बनली असल्याने शरीफ आणि त्यांची कन्या तिकडे गेले आहेत. आम्हाला तिच्या सोबत असणे महत्वाचे आहे असा ट्‌विटर संदेश शरीफ यांची कन्या मरयम शरीफ यांनी प्रसृत केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)