नवसाच्या पोरासह कुटुंबही संपले

कोल्हापूर – बालेवाडी येथील केदारी कुटुंबातील बारा जण भरत केदार यांच्या सानिध्य या नऊ महिन्याच्या मुलाच्या जन्माचा नवस व देवदर्शन निमित्त बहिण छाया नांगरे आणि मनिषा वरखडे यांचे कुटुंब असे सर्वजण या वाहनातुन गणपतीपुळे येथुन देवदर्शनन झाल्यानंतर कोल्हापूर येथे करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन आणि मुक्कामासाठी आले होते.पण यातील तेरा जणांवर सर्वांवर काळाने घाला घातला.

ज्या नवसा च्या पोरासाठी हे सर्वजण आले होते.त्या सानिध्यासह त्याचे कुटुंबियही यामध्ये संपले.सकाळी आठच्या सुमारास शेवटचा मृतदेह या मुलाचा उदयसिंह निंबाळकर यांनी काढला.यावेळी पाहणाछयांचेही मन गहिवरुन गेले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)