नववीबरोबर अकरावीच्या विद्यार्थ्यांचीही फेरपरीक्षा घ्या

संग्रहित छायाचित्र

आमदार कपिल पाटील यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
पुणे – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्षापासून नववीतील नापास होणाऱ्या मुलांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हाच निर्णय इयत्ता अकरावीतील विद्यार्थ्यांनाही लागू करावा अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.

पुनर्परीक्षा ही केवळ त्या विषयांची परीक्षा नसून त्या विद्यार्थ्यांच्या कमी बाजूंवर आधी उपचारात्मक शिक्षण पध्दतीचा अवलंब करुन काम केले जाते व त्यानंतर ती परीक्षा घेण्यात येत असते. अकरावीसाठी जर अशा परीक्षेचा निर्णय घेतला तर तो अशाच प्रकारचा घ्यावा लागेल.
अ.ल.देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

आठवीपर्यंत पासची ढकलगाडी संपल्यानंतर विद्यार्थी नववीतीत येऊन अडकत असेल. नववीतील नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यांच्यासाठी शासनाने उपचारात्मक शिक्षण पध्दती काढत पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र इयत्ता नववीमध्ये ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नापास होतात त्याचप्रमाणात इयत्ता अकरावीतही विद्यार्थी नापास होतात. त्यांचेही वर्ष वाया जाऊ नये तसेच अकरावी नंतरशी विद्यार्थी गळती रोखण्याच्या हेतूने शासनाने इयत्ता अकरावीसाठीही उपचारात्मक शिक्षण पध्दतीचा अवलंब करत त्यांची परीक्षा घ्यावी. यामुळे मुलांचे पुढील शिक्षण घेण्याचे धैय वाढण्यास मदत होईल असेही पाटील यांनी सांगितले. अकरावीत ज्या विषयात विद्यार्थी नापास होतील तेवढ्याच विषयांची परीक्षा जूनमध्ये पुन्हा घ्यावी आणि त्यांना बारावीसाठी प्रवेश द्यावा अशा माहितीचे पत्र कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लिहिले आहे.
दरम्यान याबाबत शिक्षणतज्ज्ञ अ.ल.देशमुख म्हणाले, केवळ परीक्षा घेऊन उपयोग नाही तर तशा प्रकारचे शिक्षण देणे गरजेचे आहे. नाहीतर अशा कितीही परीक्षा घेतल्या तरीही विद्यार्थ्यांला त्याचा फारसा उपयोग होईलच असे नाही.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)