नववर्षातील पहिले चंद्रग्रहण आज

पुणे – 2019 हे वर्ष अवकाशप्रेमींसाठी खास असेल असे म्हटले जात होते. या वर्षात एकूण पाच ग्रहणे असतील. यात तीन सूर्यग्रहणे तर दोन चंद्रग्रहणे असतील. यातील पहिले चंद्रग्रहण आज होणार आहे.

सहा जानेवारी रोजी पहिले सूर्यग्रहण पार पडले त्यानंतर आता हे चंद्रग्रहण होणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असून यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका रेषेत असतील. हे ग्रहणही भारतात दिसणार नाही याचे कारण म्हणजे त्यावेळी भारतात दिवस असल्याने प्रकाश असेल. मात्र हे ग्रहण अफ्रीका, युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका याठिकाणी दिसणार आहे.

या ग्रहणाला ब्लड मून असे म्हणण्यात आले असून त्याचा भारतीय हवामान आणि वातावरणावर परिणाम होणार आहे. या ग्रहणामुळे देशातील थंडी वाढणार असून उत्तर आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होणार आहे. याआधी अशाप्रकारचे पूर्ण चंद्रग्रहण 1700 वर्षांपूर्वी पडले होते. ग्रहणकाळात काही गोष्टी करु नयेत असा समज भारतीयांमध्ये आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण 20 जानेवारी रोजी सकाळपासून 21 जानेवारीच्या पहाटे 2 .30 पर्यंत दिसणार आहे.

2 आणि 3 जुलैदरम्यान पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. मात्र यावेळी भारतात रात्र असल्याने हे सूर्यग्रहणही भारतीयांना दिसणार नाही. तर याच महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला अंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाचा एकूण कालावधी दोन तास 38 मिनिटे इतका असेल. हे ग्रहण दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका ऑस्ट्रेलियासोबतच आशिया खंडातही दिसणार आहे. त्यामुळे भारतीय नागरिक हे ग्रहण पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. तर 26 डिसेंबर 2019 रोजी वर्षातील शेवटचे ग्रहण असेल. हे वर्तुळाकार सूर्यग्रहण भारतात दिसेल. देशाच्या दक्षिण भागातून हे ग्रहण जास्त चांगले दिसू शकणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
11 :thumbsup:
10 :heart:
1 :joy:
3 :heart_eyes:
1 :blush:
10 :cry:
23 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)