नववर्षाच्या संकल्पांविषयी थोडेसे….

जुने वर्षे जाऊन नवीन वर्षे लागले. बघता-बघता नवीन वर्षाचा पहिला आठवडाही संपला. आता मला सांगा जुन्या वर्षाला निरोप देतांना आपण नवीन वर्षासाठी किंवा नवीन वर्षात करण्यासाठी जे

चांगले संकल्प केले होते, ते किती जणांनी आतापर्यंत लक्षात ठेवलेत आणि किती जण त्यांची अंमलबजावणी करताहेत? माझ्या अनुभवाप्रमाणे तर अनेक जण आपला संकल्पही विसरले असतील. माझ्या मित्रपरिवाराबाबत माझा तरी आजपर्यंत हाच अनुभव राहिला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक संकल्प मोठ्या उत्साहाने केले जातात मात्र काही दिवसांमध्येच हा उत्साह पूर्णपणे मावळून जातो. काही लोक तर फक्त इतर लोक करतात म्हणून नावाला संकल्प करत असतात, त्याच्या उद्देशाविषयी अशा लोकांना काहीही देणेघेणे नसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परंतु आपण सर्वानीच हे देखील लक्षात ठेवायाला हवे की, संकल्प हा केवळ नवीन वर्ष आले म्हणून किंवा काही नवीन गोष्टी आल्या म्हणून करायचा नसतो, तर संकल्प अगदी विचारपूर्वक आपल्या ध्येयपूर्तीसाठीचा स्वाध्याय म्हणून करायचा असतो. संकल्पाचे पालन आपले ध्येय किंवा लक्ष प्राप्त होईपर्यंत नियमित करावे. संकल्पाप्रमाणेचं कुठल्याही नव्याचे “नव्याचे नऊ दिवस” या उक्तीप्रमाणे फक्त सुरुवातीचे काही दिवस पालन न करता ते अविरतपणे करणे आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे अन्‌ आपणही ते निश्‍चितपणे केलेच पाहिजे. एकदा कुठल्याही गोष्टीचा विचारपूर्वक संकल्प केला की, मग मागे वळून न पाहता संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय-काय करता येईल यावर आपण आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. सगळ्यांना आपापले नवीन वर्षानिमित्त वा इतर केलेल्या संकल्पांच्या पूर्ततेसाठी शुभेच्छा.

– अतुल शिरडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)