नववर्षाच्या पूर्वसंध्येला निकृष्ट आहार

पुणे – ऐन नववर्षाच्या पूर्वसंध्येला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना रविवारी निकृष्ट आहाराचा सामना करावा लागला. विद्यापीठाच्या आवारातील भोजनालयात (रिफेक्‍टरी) कच्चे भात, भाजीत फक्‍त तिखट रस्सा असा आहार देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी जेवण न करता विद्यापीठाच्या प्रशासनावर नाराजी दर्शविली. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने वस्तुस्थितीची पाहणी करून, त्याच क्षणी रिफेक्‍टरी व्यवस्थापकाला दहा हजारांचा दंड ठोठावला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आक्‍टोबर महिन्यात प्रत्यक्ष भोजनालयात येऊन, तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यांसमवेत रिफेक्‍टरीत जेवणाचा आस्वाद घेतला. त्यावेळी त्यांनी जेवणाचा दर्जा योग्य असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर आता पुन्हा रिफेक्‍टरीत जेवणाच्या दर्जावरून विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठातील भोजनालयात दररोजप्रमाणे रविवारी चांगल्या प्रकारचा जेवण दिला जातो. त्यात मसाला भात, गोड पदार्थ, चपाती, रस्सा असा जेवणाचा प्रकार असतात. त्यामुळे विद्यार्थी आज सुटीच्या दिवशी जेवणावर आस्वाद घेण्यासाठी भोजनालयात आले. मात्र नेहमीप्रमाणे जेवणाचा दर्जा नव्हता. रस्साही तिखट होता. धक्‍कादायक म्हणजे मसाला भात कच्चे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भात न घेता अर्धवट जेवण करून वसतिगृहाचा मार्ग धरला.

विद्यार्थ्यांनी ही बाब भोजनालय तक्रार निवार समितीचे अध्यक्ष प्रा. सदानंद भोसले यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी लगेच विद्यापीठाच्या भोजनालयात येऊन, आहाराची पाहणी केली. त्यानंतर विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. प्रभाकर देसाईही आले. विद्यार्थ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात येताच, भोसले यांनी भोजनालयाच्या व्यवस्थापकाची चांगलीच कानउघाडणी केली. रिफेक्‍टरीत तांदळाचा बॅंड प्रशासनास न कळविला परस्परही बदलण्यात आल्याचे दिसून आले. शेवटी व्यवस्थापकांनी चूक मान्य करीत, असा प्रकार पुन्हा होणार नाही, असे माफीनामा लिहून दिला.

दरम्यान, भोजनालयात काही विद्यार्थ्यांनी कच्चा भात खाल्ला. मात्र सुमारे 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी जेवणाचा आहार योग्य नसल्याच्या कारणावरून अर्धवट जेवणावर समाधान मानावे लागले. ऐन नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार घ्यावा लागल्याने विद्यापीठात तीव्र नाराजीचा सूूर होता. विद्यापीठाने चांगलीच समज दिली तरी जेवणाचा दर्जात सातत्यपणा राहील का, हेच आता पाहावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)