नववर्षाची चाहूल (प्रभात open house)

नववर्षाची चाहूल लागली. मनाला हुरहूर लागली कसलीशी. गत वर्षातील आठवणींचे पट डोळ्यासमोर तरळू लागले. एक एक माणसे आठवू लागली. केलेले संकल्प ते पूर्णत्वास नेण्यासाठी केलेले प्रयत्न आठवले. (नवीन संकल्प मनात बांधण्यासाठी वेळ मिळतो) मनाच्या कानाकोपर्‍यात फिरण्यासाठी, स्वतःच्याच मालकीच्या संपत्तीच मूल्यमापन करण्यासाठी.

मन काय आहे? हे भौतीकतेच्या पातळीवर जरी ज्ञात नसले तरी केवळ कल्पना करून त्या मनाच्या भूतकाळ नामक कप्प्यात साठविलेल्या अनेक आठवणी, घटना, सवयी यांचं मुल्यमापन करू लागली. ते ही एका वेगळ्या दृष्टीकोनातून.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माझी मैत्री पुस्तकांशी जरा जास्तच. त्यांच्या सोबत माझे बालपण संपून किशोरावस्थेत कधी पोहोचले याचा पत्ताच लागला नाही. खूप-खूप आठवणी आहेत या पुस्तकांसोबत.” प्रेमाला विरोध झाल्यावर ते प्रेम अधिकच वाढते ना” अगदी तसच झालं माझं पण. मी अभ्यास आणि वाचन या दोन गोष्टींचा ताळमेळ जमविण्यास मी शिकले. पुस्तके पाहिली आणि त्या पुस्तकांच्या पानांवरून हात फिरवताना मला जवळचा जुना मित्र सापडल्याचा आनंद झाला. खरचं लहानपणी काही गोष्टींच वेड वेगळचं असतं नाही.

माझ्या या वाचनाच्या आवडीमुळे मी गलेलठ्ठ कादंबर्‍या, कथा, चरित्र, आत्मचरित्र तसेच मधे मधे अध्यात्माची पुस्तके पण हं. असे विचारी लेखकांस वाचले त्यांच्याशी मैत्री केली. याच मैत्रीमुळे मी लेखन करण्यास सुरूवात केली ती आजतागायत करत आहे. माझा हा नैसर्गिक स्वभाव आता जरा जास्तच तीव्र झालाय.मी माझ्या या मित्राला अगदीचं जवळ केलयं.

– संगीता कुलकर्णी (लेखिका / कवयित्री)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)