नवलेवाडी येथे कलशारोहण सोहळा उत्साहात

  • हजारो भाविकांची उपस्थिती

परिंचे – नवलेवाडी (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत चैतन्य कानिफनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने गावात मिरवणूक काढण्यात आली. नव्याने बांधण्यात आलेल्या कानिफनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अहमदनगर जिल्ह्यातून पाई ज्योत आणण्यात आली असून परिंचे येथील मंदिरात ती ठेवण्यात आली आहे. यानिमित्ताने हरिजागर व कानिफनाथांच्या ओव्यांचे आयोजन करण्यात आले होते. रविवार (दि. 2) रोजी सकाळी उत्सव मूर्ती व कलशाला अभिषेक करून महापूजा करण्यात आली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. त्यानंतर उत्सव मूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात आली. छबिन्यासह निशान, काठी, अब्दागिरी, छत्री आदी लवाजम्यासह ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. वीर, परिंचे परिसरातील ग्रामदैवतांना उत्सव मूर्तींची भेट घडवून आणण्यात आली.
गावातील प्रत्येक घरासमोर गुढी उभारून कानिफनाथ महाराजांचा जयघोष करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कृष्णजन्म उत्सव साजरा केल्यानंतर पहाटे एक वाजल्यापासून मंदिरासमोरील चौकात होम हवन करण्यात आले. सकाळी सहा वाजता कानिफनाथांच्या मूर्तीला रुद्र अभिषेक व महापूजा झाल्यानंतर सांगळे महाराजांच्या हस्ते मूूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. सकाळी 9 वाजता काल्याचे कीर्तन झाले.
दुपारी बारा वाजता जंगले महाराज शास्त्री यांच्या हस्ते कलशारोहण समारंभ पार पडला. रात्री हरिजागर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. उत्सव निमित्ताने गावात श्रमदानातून ग्रामस्वच्छता व सुशोभिकरणाचे काम करण्यात आले होते. उत्सव दरम्यानच्या काळात राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, प्रांताधिकारी संजय आसवले, तहसीलदार अतुल म्हेत्रे, जिल्हा परिषदचे सदस्य दिलीप यादव, दत्ता झुरंगे, सभापती अतुल म्हस्के आदींनी दर्शनाचा लाभ घेतला. मढी (ता. पाथर्डी), बोपगाव व कामठवाडी (ता. पुरंदर) येथील भाविक उत्सवात सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)