नवलाख उंब्रे ग्रामस्थांची राळेगण-सिद्धी आणि हिवरे-बाजारला भेट

वडगाव-मावळ, (वार्ताहर) – नवलाख उंब्रेची चौदाव्या वित्त आयोगाची शेतकरी सहल राळेगण-सिद्धी व हिवरे-बाजार येथे गेली. सहलीत गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी दोन्ही गावांतील पाणी नियोजन, गटार नियोजन, जिल्हा परिषद शाळा, शेतीच्या पाण्याचे नियोजन, कुऱ्हाड बंदी, शेत तळे, बकरी बळी, दारुबंदी, नशाबंदी याबद्दल माहिती दिली.

सहलीमध्ये सरपंच दत्तात्रय पडवळ, उपसरपंच संदीप शेटे, माजी सभापती निवृत्ती शेटे, माजी उपसरपंच आबाजी बधाले, महेश शिर्के, रवींद्र कडलक, सदस्या सविता भालेकर, कांताबाई पडवळ, ग्राम विकास अधिकारी बाळासाहेब वायकर, तंटामुक्‍ती अध्यक्ष बाळासाहेब बासरकर, दिनकर शेटे, तानाजी पडवळ, बाळासाहेब शेटे, प्रभाकर बधाले, बबन जाधव, लहु शेटे, विठ्ठल बधाले, बबन उडाफे, सुभाष पापळ, सुधीर धायबर, केशव शिंदे, निजाम काझी, सोपान नरवडे, गोरख शेटे, शांताराम नरवडे, भगवान बधाले, दत्ता भांगरे, चिंधु बधाले व ग्रामस्थ आदींनी भाग घेतला.
सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी आभार मानले.

गटा-तटाचे राजकारण करण्यापेक्षा खुंटलेल्या विकासासाठी एकत्र यावे. मी उभारलेल्या आंदोलनातून देशाला माहिती अधिकार मिळाला, याचा मनस्वी आनंद आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी लढा देणार असून शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे. मी देखील आत्महत्या करणार होतो. पण स्वामी विवेकानंदांच्या व महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रभावीत होऊन तो विचार सोडला असल्याचेही हजारे यांनी सांगितले.
– अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)