नवलाख उंबरे सोसायटी अध्यक्षपदी बाळासाहेब बधाले

टाकवे बुद्रुक, (वार्ताहर) – नवलाख उंब्रे विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब बधाले यांची व उपाध्यक्षपदी सुलाबाई मेमाणे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून ए. एस. दाते यांनी काम पाहिले. संचालक दत्तात्रय पडवळ, चंद्रकांत शेटे, हनुमंत बधाले, तानाजी पडवळ, शेखर जाधव, बबन जाधव, दिलीप जगनाडे, श्रीधर शिंदे, अलका कारले, चिंधु बधाले, भगवान बधाले, सोपान बधाले, अविनाश बधाले, तसेच सचिव गुलाब ढोरे, सहाय्यक सचिव हरि शेटे आदी उपस्थित होते. हनुमंत बधाले व अलका कारले यांच्या राजीनाम्यामुळे निवडणूक झाली. अध्यक्ष व उपाध्यक्षांनी संस्थेच्या वाढीसाठी काम करण्याचा मनोदय व्यक्‍त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)