नवऱ्याने केली चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या

नागपूर,- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारुड्या नवऱ्याने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे ही थरारक घटना घडली. ममता एकनाथ कोहळे असे मृत महिलेचे नाव असून आरोपीचे नाव एकनाथ काशिनाथ कोहळे आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, एकनाथ मोलमजुरी करतो. चार वर्षांपूर्वी त्याचा ममताशी विवाह झाला होता. त्याना दोन मुले आहेत. एकनाथला दारूचे व्यसन असून तो संशयी वृत्तीचा असल्यामुळे पत्नी ममताशी नेहमी वाद होत होता. अनेकदा वादाचे रुपांतर कडाक्‍याच्या भांडणात व्हायचे. रोजच्या कटकटीला कंटाळून काही दिवसांपूर्वी ममता दोन्ही मुलांसह माहेरी निघून गेली. त्यामुळे एकनाथने घरातील वस्तू विकून दारूचे व्यसन भागविण्यास सुरूवात केली.

मात्र, जेवणाचे भागत नसल्यामुळे शुक्रवारी एकनाथ पत्नीला भेटायला सासरी गेला. त्याने ममताला सोबत चलण्यास सांगितले. तिने नकार दिल्यामुले त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी एकनाथने नमते घेण्याचा बनाव केला. यापुढे दारू पिणार नाही आणि तुझ्या चारित्र्यावर संशय घेणार नाही, असे आश्वासन तिला सासूसास-यांपुढे दिले. त्यामुळे ममताच्या आईवडीलांनी तिचे मन वळवून तिला एकनाथसोबत जाण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा गारू पिवून मताताला शिवीगाळ करत घरात पडलेल्या लाकडी दांड्याने तिला बदडणे सुरू केले. रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्‍यावर फटके मारले. त्यामुळे ममताचा यामध्ये मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)