नवराष्ट्रवाद : ट्रप्प यांच्यापुढील आव्हाने

प्रश्‍नांची गुंतागुंत पाहता ट्रम्प यांनी जर ठाम निर्णय घेतले व हे निर्णय न बोलता कृतीत आणले तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकेल. या दृष्टिने विचार करता डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टिने हा आरंभीचा काळ कसोटीचा काळ आहे. कुठल्याही लोकशाही राष्ट्राच्या प्रमुखास ज्या वादळी संकटातून जावे लागते त्या वादळी संकटातून ट्रम्प वाटचाल करत आहेत. त्यांना कसे व किती यश येते यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
कोणताही प्रश्‍न असो, अमेरिकेचे हीत सर्वप्रथम हे डोनाल्ड ट्रम्प यांचे सूत्र आहे. त्यातून त्यांचा नवराषट्रवाद हा सिद्धांत स्पष्ट होतो. ट्रप्म यांनी अलिकडे घेतलेल्या काही निर्णयांचा या लेखात उहापोह केला आहे. त्यांनी चीन, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांच्याशी मिळते-जुळते घेण्याचे नवे धोरण आरंभिले आहे. जपानला तर के आपल्या डावपेचात्मक वाटचालीतील भागीदार मानत आहेत. चीनच्या वाटचालीत प्रथमच अमेरिकेने एकसंध चीनला मान्यता देण्याचे ठरविले आहे. हे सर्व बदल त्यांच्या नव्या धोरणाचे प्रतीक आहेत.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ध्येयधोरणची वाटचाल करताना घेतलेल्या विविध भूमिकांमुळे जागतिक जनमत संभ्रमित झाले आहे. आपल्या नव्या परराष्ट्र धोरणाची आखणी करताना ट्रम्प यांनी अमेरिकेच्या हिताला प्राधान्य देण्याचे ठरिवले. तथापि त्यांच्या या धोरणाचे पडसाद अमेरिकन उपखंड पश्‍चिम गोलार्धाप्रमाणे आशिया खंडातही उमटत आहेत. आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत दहशतवादी राष्ट्रावर प्रवेश निर्बंध लावण्याचा निर्णय हा स्वागतार्ह म्हटला पाहिजे, परंतु दशांतर्गत रोजगार व सेवासंधीबाबत त्यांना आणावयाचे निर्बंध हे नवा असंतोष निर्माण करणारे ठरतील. त्यामुळे भारतीयाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कामावर काही निर्बंध आणले तर ते चिंताजनक ठरतील. लोकशाहीवादी राष्ट्राशी संबंध ठेवताना त्यांनी मित्र जोडण्याचे धोरण अनुसरावे असे आम्हाला वाटते.
पूर्व अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सर्व धोरणावर शंका घेण्याचे व घड्याळाचे काटे उलटे फिरिवण्याचे त्यांचे तंत्र हे त्यांच्यासमोरचे प्रश्‍न वाढवित आहेत. नव्या अध्यक्षांनी प्रत्येक प्रश्‍नावर नवीन समीकरणे मांडून “धक्का’ देण्याचा सपाटा लावला आहे. त्यांचे मेक्‍सिको धोरण, ऑस्ट्रेलिया धोरण आणि इस्त्रायल धोरण या सर्व बाबतीत त्यांनी केलेले सुतोवाच त्यामुळे नव्याने प्रश्‍न निर्माण करत आहे.
कॅरी अ बिग स्टिक
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात थिओडर रुझवेल्ट या अध्यक्षाने गोड बोला पण पाठीशी मोठा दंडुका बाळगा. स्पीक सॉफ्ट ऍण्ड कॅरी अ बि स्टिक हे धोरण अनुसरले होते. त्या धोरणाची पुनरावृत्ती ट्रम्प यांच्या रुपाने घडत आहे. थिओडर रुझवेल्ट यांचा दंडुका त्यांनी हाती घेतला आहे, पण त्यास त्यांनी स्पीक सॉफ्टची जोड दिली असती तर हे चित्र त्यापेक्षाही वेगळे दिसले असते. रुझवेल्ट याला पं. गोलार्धातील अनभिज्ञ फौजदार म्हटले जात असे. डोनाल्ड ट्रम्प अशी फौजदारी एकविसाव्या शतकात कशी करतील व त्यासाठी त्यांना अधिक बलोपासनेची गरज आहे. खरे तर जागतिक राजकारणामध्ये शक्‍ती व युक्‍तीचा सुरेख संगम केला तरच नवी प्रतिमा तयार करता येते हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. ट्रम्प यांच्या नव्या धोरणाचे पडसाद हे खुद्द अमेरिकेतही चिंताजनक ठरले आहेत. या धोरणाची गणिते वा त्यांचे फलिते यांचा विचार करता नव्या ध्येयधोरणाची गंभीरपणे आखणी करताना घ्यावयाचे निर्णय हे विचारपूर्वक कसे घेतले जातील याची चिंता वाटत आहे.
परराष्ट्रमंत्री नवे प्रश्‍न जुने
अमेरिकेपुढील प्रश्‍नांचा गुंता जुना आहे, पण हे जुने प्रश्‍न नवे परराष्ट्रमंत्री कसे हाताळतील याची अभ्यासकांना शंका वाटत आहे. तेथील व्यवस्थेप्रमाणे अध्यक्ष आपल्या वर्तुळातील सहाय्यभूत ठरणाऱ्या धुरिणांना सचिवपदी नियुक्‍त करत असतात. त्याप्रमाणे ट्रम्प यांनी टिलर्सन यांची परराष्ट्रमंत्री पदावर नियुक्‍ती केली आहे. ऑकसॉन मॉबि या तेलउत्पादक कंपनीचे सीईओ आर. टिलर्सन हे अमेरिकेचे नवे परराष्ट्र सचिव झाले आहेत. ते रशियाचे प्रे. ब्लादीमीर पुतीन यांचे स्नेही मानले जातात. त्यांच्यापुढे खरे आव्हान आहे ते ट्रम्प यांचे समर्थन करण्याचे खालील 1000 जुने अधिकारी व मुत्सद्दी हे ट्रम्प विरोधी आहेत. मुस्लिम राष्ट्राच्या प्रवेशाकरीता देशात असंतोष आहे. मागील सरकारच्या काळात हिलरी यांना 94.2 तर जोन कॅरी यांना 94.3 असा कौल प्राप्त झाला होता. असा टिलर्सन यांच्यापुढे नवे आव्हान आहे ते परराष्ट्र धोरण गतिमान करण्याचे आता टिलर्सन काम करतात हे पाहावयाचे आहे.
पुन्हा नवे वादळ
ऑस्ट्रेलियाचे नेते टर्नबुल यांना ट्रम्प यांनी फोन करून ओबामा सरकारनेही दिलेले जुने डिल मान्य केले होते, परंतु त्यांनी व्टिट करून गोंधळ टाकणारे विधान केले. ओबामाकालीन डिल हे बकवास हे थापेबाजीचे आहे. ऑस्ट्रेलियन निर्वासितांना अमेरिकेत आश्रय देण्याची तयारी ओबामा यांनी दाखविली होती. त्यावर ट्रम्प यांनी प्रश्‍नचिन्हे उभे केले आहे. ऑस्ट्रेलिया हे अमेरिकेचे मित्र राष्ट्र पण पंतप्रधान टर्नबुल यांच्याशी बोलताना ट्रम्प यांनी संतापाने दूरध्वनी अपटला हा किस्सा अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये गाजला. एकच दिवशी दोन वक्‍तव्यातील संभ्रम पाहाता कोणते धोरण खरे मानावयाचे हा प्रश्‍न पडतो. ऑस्ट्रेलियन निर्वासितांचा प्रश्‍न हाताळताना ट्रम्प यांनी केलेली विरोधाभासात्मक विधाने ही नवा संभ्रम निर्माण करणारी ठरली आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या विक्षिप्तपणावर राजकीय निरीक्षक टीका करत आहेत. त्याची ट्रम यांना पर्वा नाही.
धर्म आणि नोकरी
अमेरिकेमध्ये धर्माच्या आधारे नोकरी देणे वा नाकारणे हे घटनेनुसार योग्य ठरत नाही, परंतु ट्रम्प यांचा नवा आदेश नव्या वादंगाला तोंड फोडत आहे. अध्यक्षांच्या नव्या वादठास्त धोरणाचे जगभर पडसाद उमटले आहेत. अशा प्रकारचा हा धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणेल. त्यामुळे घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावर प्रश्‍नचिन्ह उदभवू शकेल. वॉशिंग्टन पोस्ट या पत्राच्या मते, प्रस्तावाचा मसुदा अयोग्य आहे. धर्माच्या कोणत्याही लाथाडले जाऊ शकते. व्हाईट हाऊसचे प्रवक्‍ते सी. एम. स्पाईसर यांच्या मते, धर्मावरून नोकरी नाकारण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नाही सरकारपुढे अनेक नवी आव्हाने आहेत, पण केवळ नव्या कल्पणावरच भर नाही. ट्रम्प यांच्या या सर्व वादळी धोरणांपैकी त्यांचे धार्मिक धोरण अधिक चिंताजनक आहे, असे निरीक्षकांना वाटते. त्यात थोडेसे तथ्य आहे. कारण अलीकडे बंदी घातलेल्या पाच देशांतील नागरिकांच्या संदर्भात कठोर निर्णय घेण्यात आला आहे व 56 हजार पेक्षा अधिक व्हीसा रद्द करण्यात आले आहेत. या प्रश्‍नावर अमेरिकेतील काही सुजाण नागरिक न्यायालयाकडे धाव घेत आहेत. त्याचा कौल काय लागतो याकडेही अनेकांचे लक्ष आहे.
समारोप
वादळी वक्‍तव्यामुळे प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे अनेक प्रश्‍न आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ही सर्व धोरणे अमेरिकेपुढे डोकेदुखी निर्णय करत आहेत. संभ्रमित करणारी वादठास्त विधान न करता त्यांनी थोडे सामोपचाराने घ्यावे, सबुरीने घ्यावे असे निरीक्षकांना वाटते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादठास्त विधानांचे स्वरूप पाहता त्यांच्या ध्येयधोरणाचे समर्थन कसे करावे हा ट्रम्प प्रशासनापुढे खरा प्रश्‍न आहे. अमेरिकन राज्यघटनेचे पावित्र्य कसे कायम ठेवतात. मित्र राष्ट्राशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध कसे सुधारावयाचे हे सर्व प्रश्‍न समोर आहेत, परंतु सत्ताठाहण केल्यानंतर एक महिनाही उलटला नाही तरी ट्रम्प अनेक वादठास्त विधाने करून नवे प्रश्‍न निर्माण करत आहेत. शिवाय प्रसार माध्यामांवर विनाकारण आगपाखड करून त्यांनी या प्रश्‍नामध्ये भर टाकली आहे. त्यामुळे यापुढे अशी वादठास्त धोरणे व विधाने न करता समजूतदारपणे धोरण आखावे जर त्यांनी अशी कटू भाषा व वादठास्त विधाने टाळली तर अमेरिकेपुढचे प्रश्‍न गुंतागुंतीचे न होता सुसंस्कृत होऊ शकतील.
युपढे आणखी धोरणे त्यांनी विचारपूर्वक संमजसवपणे आखावीत व अंमलात आणावीत. यापुढे अनेक प्रश्‍नांचे डोंगर उभे आहेत ते प्रधान्याने सोडवावे लागणार आहेत. ट्रम्प यांनी प्रारंभीच नमनाला घडाभर तेल खर्ची घालू नये. त्यामुळे त्यांचे आरंभीचे पाऊल हे पालथ्या घड्यावर पाणी पडावे तसे निरर्थक ठरण्याचा धोका आहे. एक समर्थ लोकशाही राष्ट्र त्याचे धर्मनिरपेक्ष संविधानिक रूप यांची चिंता वाटवी असाच हा काल आहे, पण लक्षात कोण घेणार? ट्रम्प यांचा दहशवादविरोधी पावित्रा सर्व लोकशाही राष्ट्रांना सुखावणारा आहे. त्यांनी इस्लामिक दहशतवादाच्या विरोधत ठोस पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. असे करताना ते अभिमन्यूप्रमाणे चक्रव्यूहातून बाहेर कसे पडतील याची चिंता वाटते. कारण प्रश्‍नांची गुंतागुंत पाहता त्यांनी जर ठाम निर्णय घेतले व हे निर्णय न बोलता कृतीत आणले तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकेल. या दृष्टिने विचार करता डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टिने हा आरंभीचा काळ कसोटीचा काळ आहे. कुठल्याही लोकशाही राष्ट्राच्या प्रमुखास ज्या वादळी संकटातून जावे लागते त्या वादळी संकटातून ट्रम्प वाटचाल करत आहेत. त्यांना कसे व किती यश येते यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. उत्तर कोरीयाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीबद्दल ट्रम्प नाराज आहेत. त्यावर ते कोणती ठाम भूमिका घेतात याकडे जगाचे लक्ष लागले आहे. तसेच चीनी समुद्रातील चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी त्यांना काही पाऊले टाकावी लागतील. मेक्‍सिकोतील भिंत बाधण्याच्या प्रश्‍नावरही ते ठाम आहेत. एकूणच ट्रम्प यांचा नवराष्ट्रवाद अंतर्गत आणि बाह्य दोन्ही पातळीवर अधिक सक्रीय धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज झाला आहे. या धोरणांच्या अंमलबजावणीत काही अडचणी आहेत. परंतु, ट्रम्प यांचा आत्मविश्‍वास पहाता ते यशस्वी होतील यात शंका नाही.

– डॉ. वि. ल. धारूरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)