नवरात्रोत्सवामुळे परंपरेची जपणूक -माने

रेडा- नवरात्री उत्सवानिमित्त इंदापूर तालुक्‍यातील भवानिकांनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथून ज्योत आणून, जिवनातील चैतन्य कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करतात, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परीषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रविण माने यांनी व्यक्त केले. इंदापूर येथे सोनाई परिवाराच्या वतीने भाविकांना फराळ व मसाला दूध वाटप माने यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, सालाबाद प्रमाणे यंदाही सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्या मार्गदर्शनाखाली फराळ व दुधाचे वाटप केलेले आहे. सामाजिक बांधिलकी नात्याने सोनाई परिवार कामकाज करीत असून ग्रामीण भागातील ऋनानुबंद जपण्यासाठी तसेच धार्मिकता मधून जनतेची मने आनंदी करण्यासाठी नवरात्र उत्सवात देवीचा जागर केला जातो.तुळजापूरच्या आई भवानीचे दर्शन घेऊन तेथून भक्‍तीज्योत घेऊन रस्त्याने ही ज्योत तेवती ठेवत पळत आपापल्या गावी घेऊन येतात. याच भाविकांच्य सेवेसाठ आगामी काळात देखील सोनाई परिवार कार्यरत राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)