नवरात्रीसाठी सजले श्री घारजाई माता मंदिर

निगडी – रुपीनगर-तळवडे भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री घारजाईमाता मंदिरात, नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापनेच्या निमित्ताने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील स्वच्छतेसह मंदिर रंगरंगोटी व दीपमाळ स्वच्छतेची कामे करण्यात आली आहेत. तसेच नऊ दिवस होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन आणि नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.

सभा मंडप, दर्शनबारी तसेच संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रीच्या काळात या मंदिरात खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. भाविकांच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या आहेत. बुधवार (दि.10) रोजी निगडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते घटस्थापना व देवीची आरती होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे दसऱ्याच्या (दि.18) दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. नवरात्रीच्या काळात भजन, कीर्तन होणार असून देवीच्या गाण्यांचा कार्यक्रमही होणार आहे. मंदिरात दररोज सकाळी व संध्याकाळी आरती अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहातात. आरतीच्या वेळी व नऊ दिवस दर्शनासाठी होणारी महिला भाविकांची गर्दी लक्षात घेऊन योग्य ते नियोजन केले असल्याची माहिती श्री घारजाईमाता मंदिराचे मुख्य विश्वस्त अशोकराव पवार यांनी दिली.

-Ads-

वर्गणी विना चालणारा उत्सव
कोणताही सार्वजनिक उत्सव म्हटले की, वर्गणी गोळा केली जाते. परंतु श्री घारजाई माता मंदिरात नवरात्री उत्सवासाठी वर्गणी मागितली जात नाही. याबाबत मंदिराचे मुख्य विश्‍वस्त पवार यांनी सांगितले की, कोणत्याही वर्गणी शिवाय हा उत्सव लोक मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाविकांनी दिलेल्या दानातून व मदतीतूनच दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तसेच त्रिपुरा पौर्णिमेला दिव्याच्या झगमगाटाने संपूर्ण मंदिर परिसर झळाळतो. नवरात्रीत नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, या सर्व आयोजनांना भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभतो.

‘श्री घारजाई मातेविषयी भाविकांच्या मनात प्रचंड श्रद्धा आहे. मनोकामना पूर्ण करणारी देवी अशी नागरिकांमध्ये मान्यता असल्याने खूप मोठ्या संख्येने श्रद्धाळू नवरात्रीच्या काळात येथे दर्शनासाठी येत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धाळुंची गर्दी पाहता नियोजन आणि व्यवस्था करण्यात आली आहे.’
अशोकराव पवार, मुख्य विश्‍वस्त, श्री घारजाईमाता मंदिर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)