नवरात्रीसाठी काळ्या मातीचे वितरण

निगडी – वाढत्या शहरीकरणामुळे सध्या काळी माती शहरात दिसेनासी झाली आहे. नवरात्रीमध्ये घटस्थापनेसाठी काळ्या मातीस विशेष महत्त्व असते. भाविकांना काळ्या मातीसाठी फिरावे लागत असल्याचे लक्षात घेऊन स्विकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर यांनी तळवडे परिसरात भाविकांना काळ्या मातीचे वाटप केले. पांडुरंग भालेकर यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, काळी माती दुर्मिळ झाली आहे. रुपीनगर तळवडे परिसरात नागरिकांना काळी माती मिळावी यासाठी ट्रॅक्‍टरद्वारे माती आणून ठिक-ठिकाणी वितरण करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम राबवताना पर्यावरणाची देखील विशेष काळजी घेत कापडी पिशव्यांमध्ये वाटप करण्यात आले असलीयाचे देखील भालेकर यांनी सांगितले. या उपक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)